

गोव्यातील आम आदमी पक्षातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी पक्ष सोडल्यानंतर, अवघ्या काही तासांतच पक्षाचे संघटन सरचिटणीस आणि हंगामी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणारे श्रीकृष्ण परब यांनीही आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
उसगाव परिसरातील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे मोठे ढीग साचल्याने संपूर्ण परिसराचे वातावरण विद्रुप झाले आहे. या गंभीर समस्येकडे उसगाव-गांजे पंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करत असून, कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत पंचायत प्रशासन 'फेल' ठरल्याची टीका आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी आज कुठ्ठाळी मतदारसंघातील शरयू-टोयोटा ते वेर्णा जंक्शनपर्यंतच्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. या परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
फोंडा तालुक्यातील बेतोडा बायपास रोडवर सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे एलपीजी (LPG) गॅसची चोरी आणि हस्तांतरण करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली.
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) अंतर्गत, ग्रामीण विकास विभाग, गोवा सरकार यांच्या वतीने सत्तरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच सदस्य व संबंधित घटकांसाठी आज वाळपई येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
फोंडा तालुक्यातील भोम येथे पंचायत कार्यालयासमोर आज एक भीषण अपघात झाला. दुचाकी आणि स्कूटर यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत एका स्कूटरस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे.
गोवा शिपयार्ड येथे 'आयसीजीएस समुद्र प्रताप' नौकेच्या कार्यान्वयनावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या संरक्षण उत्पादनातील वाढत्या ताकदीचा गौरव केला. "आज भारताने संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात इतकी प्रगती केली आहे की, अत्यंत जटिल आणि आव्हानात्मक उत्पादन प्रक्रिया हाताळण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम आहोत," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भारताच्या सागरी सुरक्षेसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'आयसीजीएस समुद्र प्रताप' ही प्रदूषण नियंत्रण नौका भारतीय तटरक्षक दलात अधिकृतपणे सामील करण्यात आली.
दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळाचे भविष्य आणि तिथली नागरी उड्डाणे बंद होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे स्पष्ट केले आहे की, दाबोळी विमानतळ नागरी वापरासाठी सुरूच राहील आणि हे संपूर्ण संकुल नौदलाच्या ताब्यात देण्याचा कोणताही विचार नाही.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आलेल्या पर्यटकांना चोरीचा कटू अनुभव आला आहे. काणकोण येथील एका गेस्ट हाऊसमध्ये मुक्कासाला असलेल्या पर्यटकांचे मौल्यवान लॅपटॉप्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.