

कोडार कोमुनिदाद मध्ये अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे .६ जणांची जागा कमी केली. कोमुनिदाद समिती बरखास्त करण्याची मागणी कसमशेळ लोकांनी केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दाबोळी विमानतळावर दाखल, मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचं स्वागत केलं.
अमलीपदार्थांच्या तस्करीविरोधात कोलवाळ पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. याप्रकरणी छापेमारी करून पोलिसांनी तब्बल ५ लाख ५० हजार किमतीचा ५ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला असून संशयित गोविंद रंगी (१९) याला अटक केली आहे. गुरुवारी दुपारी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गोविंद रंगी याला ताब्यात घेतले. तो मूळचा राजस्थनातील रहिवासी आहे. पोलिसांनी संशयिताकडून गांजासह मोबाइलही जप्त केला. पोलिस निरीक्षक संजित कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बोरी सरपंचपदी सागर नाईक बोरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय. सर्वांना बरोबरीने घेऊन विकास करणार असल्याचं मत सागर नाईक बोरकर व्यक्त केलंय.
मोले बाजार परिसरात अज्ञात चोरांनी दुकानफोडीची घटना घडवून आणल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील व्यापारी रुपेश गांवकर यांचे दुकान फोडलं आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.
मोल्या येथून कर्नाटकच्या दिशेने जात असलेल्या एका अवजड ट्रकने मोले चेकनाका परिसरातील सुरक्षा स्कॅनरला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात चेकनाका वरील स्कॅनर यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संबंधित ट्रक चालक दारूच्या नशेत वाहन चालवत होता, अशी माहिती समोर आलीय.
फोंडा - मडगाव महामार्गावरील बोरी पुलाच्या दुरुस्तीकामासाठी येत्या शनिवारी २९ आणि रविवार ३० रोजी तसेच पुढील शनिवार ६ व रविवार ७ रोजी काही काळ अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी यासंबंधी जारी केलेल्या सूचनेत शनिवारी २९ रोजी सकाळी ८ ते रविवारी ३० रोजी सकाळी ८ पर्यंत तसेच शनिवारी ६ रोजी सकाळी ८ ते रविवारी ७ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पुलावरील सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीसाठी बंदी असेल,
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.