
31 मार्च ते 2 एप्रिल रोजी उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात काही ठिकाणी गडगडाटी वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कुडचडे येथील महिलेची 1.05 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी JMFC सांगे यांच्याकडून आरोपी अमित बाविशी (रा. चेन्नई, तामिळनाडू) याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जानेवारी 2025 मध्ये कुडचडे पोलीस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास कुडचडे पीएसआय प्रमोद तारी करत आहेत.
राज्याचा अर्थसंकल्प समतोल साधणारा. 247.30 कोटींची तरतूद केल्याने डिचोलीच्या विकासाला गती मिळणार. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना आशावाद.
बोर्डा येथे भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने उल्हास वाडकर (५५) या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी मोटारसायकल स्वारावर गुन्हा दाखल.
मी उत्तर गोव्याचे खासदार आणि राज्यसभेच्या खासदारांना माझ्यासोबत येण्यासाठी बोलावत आहे जेणेकरून आपण तिघेही एकत्र येऊन दिल्लीत गोव्यासाठी लढू शकू. म्हादईसारख्या मुद्द्यांवर कर्नाटकचे खासदार एकत्र येत आहेत, त्यामुळे गोव्याचे खासदार म्हणून आपणही एकत्र उभे राहिले पाहिजे. चांगली बातमी अशी आहे की मी कर्नाटकातील काही स्वयंसेवी संस्था आणि गटांच्या संपर्कात आहे, जे एक सकारात्मक लक्षण आहे: दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस
शिक्षण विभागाला शाळा पुन्हा सुरू होण्यास विलंब झाल्याबद्दल पालकांकडून एकूण ४,०४७ हरकती प्राप्त झाल्या होत्या यातील अनेक हरकती एकसारख्या होत्या फक्त वेगवेगळ्या स्वाक्षऱ्या होत्या सुकाणू समितीने नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिल रोजी फक्त सहावी ते दहावी आणि बारावीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे शाळा सकाळी ११:३० पर्यंत सुरू राहतील उन्हाळी सुट्टी १ मे ते ४ जून पर्यंत असेल: शैलेश झिंगाड
कुडचडे-केपे रोडवर दोन दुचाकींमध्ये अपघात झाल्याची नोंद झाली आहे. एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले.
मोले नंद्रण येथे हॉस्पेटहून आमोणा येथे खनिज माल घेऊन येणारा ट्रक जळून खाक. ट्रकचा टायर फूटून आग लागल्याची माहिती. ७० लाखांचे नुकसान. पोलिस व अग्नीशामक दल घटनास्थळी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.