Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Goa Marathi Breaking News 27 July 2025: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या घडामोडी.
Marathi news Goa today
Marathi news Goa todayDainik Gomantak
Published on
Updated on

नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

नागपंचमीसाठी नागोबा सज्ज, होंडा सत्तरी येथील मूर्तिकार दीपक गावकर यांनी तयार केलेले नागोबा.

सूर्ल येथे प्रस्तावित ईको टुरिझम प्रकल्पाच्या ठरावाला एकमताने मान्यता

ठाणे - डोंगुर्ली ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत सादर सूर्ल येथे प्रस्तावित ईको टुरिझम प्रकल्पाच्या ठरावाला एकमताने मान्यता. सुर्ला सत्तरी येथील इको टुरिझम प्रकल्प लवकरात लवकर अस्तित्वात आणा, ग्रामस्थांची ग्रामसभेत माग

चिंबेलमध्ये पिटबुलचा 10 वर्षांच्या मुलीवर हल्ला

चिंबेलमधील इंदिरा नगरमध्ये एका पिटबुलने मारहाण केल्याने १० वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाली. हा कुत्रा पीडितेचा शेजारी अब्दुल रहमान मल्लूर यांचा मुलगा रियाज मल्लूर याचा आहे. या घटनेनंतर, मुलीला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी जीएमसीमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात  200 काजुची रोपे  लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

बेतोडा जंक्शन ते औद्योगिक वसाहत पर्यंतच्या दिड किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती ८ दिवसांत न केल्यास २०० काजुची रोपे खड्ड्यात लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

मुरगाव नगर परिषदेने (एमएमसी) वास्को येथील आठवडाभर चालणाऱ्या श्री दामोदर सप्ताह मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांचे, विक्रेत्यांचे आणि खरेदीदारांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी २० कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे.

मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे उद्घाटन केले, जो मातृत्व आणि पर्यावरणाचा उत्सव साजरा करतो.

नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

पणजी महानगरपालिकेच्या मार्केटसमोर दक्षिणमुखी प्रवेशद्वारासमोर दुचाक्यांना पार्क करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यासाठी बॅरिगेट्स उभे केले आहेत. या बॅरिगेट्समधून मार्केटमध्ये जाण्यास मार्ग ठेवला आहे. बॅरिगेट्सवर 'नो पार्किंग' फलक लावले आहेत, तरी प्रवेशाच्या ठिकाणी दुचाक्या पार्क केल्या जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी सकाळी त्याचा अनुभव अनेकांना आला. वाहतूक नियंत्रण पोलिस या ठिकाणी नसल्यानेच दररोज अशा घटना घडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com