
येत्या 19 डिसेंबरपर्यंत स्थलांतरीत मालमत्तेचा प्रश्न कायमचा सोडवा. सनद प्रक्रिया सुटसुटीत करा. मयेवासियांना पूर्ण स्वातंत्र्य मिळवून द्या. अन्यथा व्यापक आंदोलन. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मयेवासियांचा निर्धार.
श्रीनगरमध्ये झालेल्या आय-लीग फुटबॉल सामन्यात रिअल काश्मीरने डेम्पो स्पोर्ट्स क्लबचा 2-0 असा पराभव केला. या चौथ्या विजयासह, रिअल काश्मीरचे आता 16 गुण झाले आहेत, तर डेम्पो क्लब पाचव्या पराभवानंतर 11 गुणांवर कायम आहे.
राज्यात पॅराग्लायडिंगवर बंदी घातलेली नाही. केवळ सेवा निलंबित करण्यात आली आहे. कागदपत्रांची छाननी करुनच यापुढे पॅराग्लायडिंगला परवाने देण्यात येतील असे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी सांगितले.
ऐतिहासिक नाणूस किल्ल्यावर आमदार डॉ देविया राणे यांच्याहस्ते मानवंदना. उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर, मामलेदार, संयुक्त मामलेदार भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे उपस्थित. येत्या दोन वर्षांत नाणूस किल्याचे संवर्धन पूर्ण होणार.
वाळपईत बेकायदेशीर गोमांस प्रकरणी उस्मान खान आणि मोहम्मद वाली खान या बाप लेकाला वाळपई पोलिसांकडून अटक. 60 हजाराचे गोमांस आणि गाडी जप्त करण्यात आली. उस्मान खान हा सर्रासपणे गोहत्या करत असल्याने, आतापर्यंत वाळपई 3 तर फोंड्यात 4 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
आज आपल्या देशाला मोदीजींच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळाले असून याच नेतृत्व गुणांच्या बळावर आपला देश सर्वांगीण प्रगतीचे एक एक टप्पे पार करीत आहे. - कृषीमंत्री रवी नाईक. फोंडयातील क्रांती मैदानावर प्रजासत्तक दिन सोहळा उत्साहात साजरा. कृषीमंत्री रवी नाईक यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली.
नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये गोव्याचा चित्ररथ दिसला. या वर्षी, गोव्याने “स्वर्णिम भारत, विरासत और विकास” म्हणजे गोव्याची समृद्ध संस्कृती आणि प्रगती दर्शविणारा ‘सुवर्ण भारत, वारसा आणि विकास’ या थीमवर आपला चित्ररथ सादर केला.
१९६१ मध्ये गोवा स्वतंत्र होऊन त्यानंतर गोव्याला मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर सारखे युगपुरुष भेटले. तसेच त्यांच्यानंतर झालेले प्रत्येक मुख्यमंत्री शशिकला काकोडकर ते डॉ. प्रमोद सावंत यांनी चांगले कार्य करण्याचे प्रयत्न केले : मंत्री सुदिन ढवळीकर
हडफडे येथे भीषण अपघाताची नोंद झाली,वेगवान कार दुचाकीला धडकली, त्यानंतर विजेच्या खांबाला धडकण्यापूर्वी पादचाऱ्याला धडकली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पादचारी गंभीर जखमी झाला. कार चालक घटनास्थळावरून पळून गेला.
यंदाच्यावर्षी भारताने प्रजासत्ताक दिनाची ७५ यशस्वी वर्ष पूर्ण केली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.