
FDA ने औषध सल्लागार मंडळाच्या निर्देशांचे पालन करून प्राण्यांच्या वापरासाठी निमसुलाइडचे उत्पादन, विक्री आणि वितरण प्रतिबंधित केले आहे. प्राण्यांमध्ये निमसुलाइडचा वापर हानिकारक असू शकतो. FDA राज्यातील सर्व फार्मासिस्ट, उत्पादक आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांना निमसुलाइडची विक्री आणि वापर थांबविण्याचे आवाहन केले आहे.
म्हादई संबंधात सुनावणी पुढे ढकलली आहे. आज यावर निर्णय होणार होता आणि म्हणून गोव्यातून एक गट दिल्लीला रवाना झाला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी माननीय पंतप्रधानांना गोवा सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. तसेच, राज्याच्या विकासाला आणि प्रगतीला अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अनमोल मार्गदर्शन घेतले.
26 जानेवारीला सकाळी 11 वाजता पर्यें मतदार संघाच्या आमदार सौ. देविया राणे गोवा सरकारच्या वतीने क्रांतिवीर दिपाजी राणे यांना सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्यावर देणार मानवंदना. मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन
स्मार्ट’ पणजीतील डॉन बॉस्को हायस्कूल नजीक असलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा रविवारी सायंकाळी ओव्हर‘स्मार्ट’ बनली. एकाच वेळी हिरवा व लाल दिवा पेटू लागल्याने वाहनचालक मात्र गांगरले. शेवटी प्रश्न ‘तालांव’चा!
सत्तरीतील खोतोडे पंचायतीतत मोबाईल रेंजची समस्या. रेंज नसल्याने विद्यार्थी व स्थानिकांची होते गैरसोय. बीएसएनएल अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद नाही.
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्राचा महामंत्र आहे. या महिन्याच्या २४ तारखेला ‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कन्याकुमारी विवेकानंद केंद्राच्या गोवा शाखेतर्फे राज्यातील सर्व विद्यालयांत सकाळी १० वाजता एकाच वेळी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत गायिले जाणार आहे.
पेडणेतील सरकारी कार्यालयात अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग गेल्या १५-२० वर्षापासून एकाच पदावर आहेत; त्यांची बदली करणार : आमदार प्रविण आर्लेकर
जमीनींच्या व्यवहारात गोलमाल केल्या प्रकरणी कवळे मठाचे शिवानंद सरस्वती स्वामी, अवधूत श्रीराम काकोडकर व मनोहर आडपईकर यांच्याविरोधान गुन्हा दाखल. मठाची फोडा तालुक्यातील जमीन विकताना विद्यमान स्वामी शिवानंद सरस्वती यांनी स्वर्गवासी सव्विदानंद सरस्वती यांची सही करून तोतयेगिरी केल्याचा गंभीर आरोप कवळे मठाच्या प्रतिष्ठित अनुयायांनी केला आहे.
उत्तर गोवा पोलिसांनी सिरियल ब्लफमास्टर टोळीचा यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. मुथूट फायनान्सचा कर्मचारी असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराशी संपर्क साधला. सोन्याचे आश्वासन देऊन त्याने पीडितेला १,००,००० रुपये रोख देऊन फसवले. मनीष शशिकांत आंबेकर (४७ – टोळीचा म्होरक्या), शिवम मनीष आंबेकर (२४), रवी श्रीपती चव्हाण (४२), करण रवी चव्हाण (२०) आणि यश रवी चव्हाण (२०) यांना पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपी व्हीटीसी पळस्पे, पनवेल, रायगड, महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत.
कवळे मठांच्या स्वामींविरुद्ध गुन्हा नोंद. जमिनींच्या व्यवहरात गोलमाल.
गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतलीआणि पक्ष बळकटीकरण आणि गोव्याच्या विकासाबाबत चर्चा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.