
पोलिसांच्या कोठडीतून जेव्हा आरोपी पळून जातो ती पोलिसांची चूक असते असे भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले आहेत.
सुलेमान खान याला गुन्हे शाखेच्या कोठडीतून पळून जाण्यास मदत करणाऱ्या आयआरबी डिसमिस कॉन्स्टेबल अमित नाईक याला पणजी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
चिंबलमधील एका क्रशर साइटवर दुर्दैवी घटना घडली. मशीनचा लोखंडी भाग पडल्याने एका कामगाराचा गंभीर दुखापत झाली. जखमी कामगाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पर्ये सत्तरीतील भुमिका साखळेश्वर देवस्थानात आज आणि उद्या सर्व समाजा एकत्र येत करणार गवळण काल्याचा उत्सव.
पर्ये उत्सवाला मान्यता दिल्याने लोकांचा उठाव शमला. साखळी -मोर्ले रस्ता वाहतूकीस खुला. श्री भूमिका देवस्थानाचा धार्मिक सप्ताक होणार.
पर्ये साखळेश्वर देवस्थान प्रकरण संदर्भात तोडगा काढण्यासाठी वाळपई, सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, मामलेदार तसेच इतरांची उपस्थिती.
गोमांस वाहून नेणाऱ्या कर्नाटक नोंदणीकृत वाहनाची चौकशी करण्याचा प्रयत्न करताना एसजीपीडीए मार्केटमधील गोमांस व्यापाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा गोरक्षकांचा आरोप आहे. ३ गोरक्षक जखमी.
मुख्यमंत्री घरात नसताना गोवा काँग्रेस पक्ष आल्तिनो मधील घरावर मोर्चा नेण्याची शक्यता. सुरक्षेसाठी पोलीस तैनाद.
साखळी व डिचोलीसह बहुतेक भागात सकाळी उशिरापर्यंत जाणवला गडद धुक्याचा प्रादुर्भाव. काजू, आंब्यांच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम शक्य.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.