
म्हापसा: गणेशपुरी-म्हापसा येथील सशस्त्र दरोड्यानंतर कुटुंबीयांनी स्वतःला सावरत पोलिसांत खबर दिली. परंतु, त्यानंतर तातडीने नाकाबंदी न केल्याने दरोडेखोर सीमा ओलांडून बेळगावकडे जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांची हलगर्जी दरोडेखोरांच्या पथ्थ्यावर पडली, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे.
दरोडेखोरांचा माग काढत गुन्हा शाखेच्या दोन टीम बेळगाव येथे; तर अन्य तीन टीम अनुक्रमे हैदराबाद, मुंबई, बेंगलोर येथे गेल्या आहेत. घटनेला ३० तास उलटून गेले. अद्याप दरोडेखोरांचा पत्ता लागलेला नाही.
दरम्यान, ज्या टॅक्सीने दरोडेखोर बॉर्डर क्रॉस गेले, त्या टॅक्सी चालकाने केलेले दरोडेखोरांचे वर्णन महत्वपूर्ण ठरणार आहे. त्या आधारे तपास सुरू आहे. सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी फिर्यादी डॉ. महेंद्र कामत घाणेकर कुटुंबीयांना बंधक बनवून त्यांच्याकडून रोख, मौल्यवान वस्तू व इतर सोन्याचे दागिने हिसकावून, जवळपास ३५ लाखांचा ऐवज पळविला.
विशेष म्हणजे, डॉक्टर कुटुंबियांनी आपल्या बंगल्याबाहेर व आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. परंतु, तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या या दरोडेखोरांनी दरोडा टाकून, जातेवेळी आपल्यासोबत किचनमधील डीव्हीआर (रिकॉर्डर) सोबत नेला. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे असूनही ते निरोपयोगी ठरल्याचे यातून दिसते. त्यामुळे लोकांच्या सुरक्षता ही रामभरोसेच असल्याचे दिसते.
एप्रिल महिन्यात जो दोनापावला येथे दरोडा टाकण्यात आला होता, त्याच लोकांनी म्हापशात लुट केली असावी, असाही कयास व्यक्त होत आहे. पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. दोनापावला येथील घटनेनंतर दरोडेखोर कोठे गेले हे कळले नव्हते. परंतु, आता मात्र म्हापशातील घटनेतील व्यक्ती नक्की सापडतील, असा विश्वास पोलिस व्यक्त करत आहेत.
पोलिसांच्या टीम बेळगाव, हैदराबाद, मुंबईत दाखल
१) दरोडेखोर लवकरच सापडतील, असा पोलिसांनी विश्वास व्यक्त केला आहे. म्हापशात जसा प्रकार घडला त्याच पद्धतीने रत्नागिरीलाही दरोडा पडला आहे. दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी असण्याची दाट शक्यता असून, त्या दिशेने तपास सुरू झाला आहे.
२) म्हापसा शहर असो किंवा बार्देश परिसरातील इतर भागांत काही बंगल्यांमध्ये सीसीटीव्ही कमरे आहेतल इतकाहीकडे श्वान आहेत. परंतु, सार्वजनिकस्थळी किंवा एण्ट्री व एक्स्झिट ठिकाणी अनिवार्य असलेले सीसीटीव्हींचा अभाव दिसतो
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.