Mapusa News : परराज्यातील पोलिसांकडून सराफींची छळवणूक

ज्वेलर्स संघटनेचा आरोप ः तपासाच्या नावाखाली त्रास देणे बंद करा; दिवसभर दुकाने बंद
अध्यक्ष समीर कुडतरकर
अध्यक्ष समीर कुडतरकरgoa digital team
Published on
Updated on

म्हापसा : तपासाच्या नावाने तसेच चोरीचे सुवर्णलंकार हस्तगत (रिकव्हरी) करण्याच्या नावाने गोव्याबाहेरील पोलिसांकडून राज्यातील स्थानिक ज्वेलर्सची होणारी मानसिक व आर्थिक छळवणूक बंद करावी. अन्यथा, ज्वेलर्स आक्रमक भूमिका घेतील, असा इशारा गोवा ज्वेलर्स संघटनेने दिला.

म्हापसा येथे आज पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष समीर कुडतरकर, उपाध्यक्ष सुब्राय चोडणकर, सचिव आदित्य नागवेकर, नहुश लोटलीकर, औंदुबर पिंगुळकर व संजय चोडणकर उपस्थित होते. या कारवाईच्या निषेधार्थ सराफींनी आज आपली दुकाने बंद ठेवली होती.

गोव्याबाहेरील पोलिस हे तपासाच्या नावाने गोव्यात येऊन संशयित ज्या ज्वेलर्सकडे बोट करतात, त्यांना विनाकारण येऊन मानसिक त्रास देतात चोरीचे दागिने परत न केल्यास सरळ अटक करण्याची धमकी देतात. ज्वेलर्स सीसीटीव्ही फुटेज तपासून शहानिशा करण्याची मागणी करतात, तेव्हा हे गोव्याबाहेरील पोलिस आमचे काहीच म्हणणे ऐकून घेत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

अध्यक्ष समीर कुडतरकर
Siddhant-Navya Goa vacation: गोव्यातून व्हेकेशनवरून परतलेल्या 'या' कपलची बी टाऊनमध्ये चर्चा...

नियमांचे पालन करूनच व्यवहार ः ग्राहकांचे ओळखपत्र, त्यांचा फोन क्रमांक तसेच आम्ही ग्राहकांना रोकड फक्त २० हजारपर्यंत देतो. त्यावरील पैसे हे धनादेश किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून देतो. अनोळखी ग्राहकांकडून सोने खरेदी करतेवेळी संबंधितास स्थानिक पोलिसांकडून ना हरकत दाखल आणण्यास सांगतो, अशा काही अटी सोने खरेदी करतेवेळी पाळतो याकडे कुडतकर यांनी लक्ष वेधले.

अध्यक्ष समीर कुडतरकर
Goa Government Schools: धारबांदोड्यातील 7 शाळांची ‘घंटा’ होणार बंद! पटसंख्येचा अभाव

हा तर सरळसरळ दरोडा!

काहीजण आमच्याकडे फक्त १० ते २० ग्रॅम सोने विकतात. मग पोलिसांसोबत आल्यानंतर आपण अमुक दुकानात ५०० ते ६०० ग्रॅम सोने विकले, असा खोटा दावा करतात. त्यामुळे गोव्याबाहेरील पोलिस आमची छळवणूक करुन त्या रक्कमेचे सोने घेऊन जातात. काहीजण अटक होण्याच्या भीतीपोटी घाबरुन सोने देतात. परंतु, या सोन्याची योग्य पावती आम्हाला दिली जात नाही. हा एक प्रकारचा दरोडा असल्याचा आरोप गोवा ज्वेलर्स संघटनेने यावेळी केला.

अध्यक्ष समीर कुडतरकर
Goa Engineer Mega Recruitment: नोकर भरती नव्हे, विक्री! इंजिनिअर मेगा भरतीचा तिढा सुटेना; युवक काँग्रेस आक्रमक

ज्वेलर्सची होणारी ही छळवणूक ताबडतोब बंद करावी, यासाठी आम्ही केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री तसेच पोलिसांना निवेदन देणार आहोत. यापुढे ही छळवणूक बंद न केल्यास ज्वेलर्स संघटना गप्प बसणार नाही. वेळ पडल्यास आक्रमक भूमिका घेऊ. अलीकडच्या काळात ज्वेलर्सना छळण्याचे २५ प्रकार गोव्यात घडलेत.

समीर कुडतकर, अध्यक्ष, गोवा ज्वेलर्स संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com