Mapusa Municipality: मार्केट परिसरातील अनागोंदीवर पालिकेची नवी योजना; ठरावात घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

Mapusa Municipal Council: म्हापसा पालिकेचा ठराव : पाच मीटर जागा सोडून बसणार विक्रेते
Mapusa Municipality
Mapusa MunicipalityDainik Gomantak

Mapusa Municipality: आपत्कालीन स्थितीवेळी म्हापसा मार्केट परिसरात अग्निशमन दलाचे वाहन तसेच रुग्णवाहिकेला मोकळेपणाने जाता यावे, यासाठी जी.के. लेनमधील कपडे विक्रेते आणि साळगावकर लेनमधील फळविक्रेते जे मधोमध बसायचे त्यांना यापुढे रस्त्याच्या बाजूला बसविण्याचा एकमुखी ठराव म्हापसा पालिका मंडळाने बुधवारी (ता.६) सर्वसाधारण बैठकीत मंजूर केला.

कारण, अग्निशमन दलाने किमान आपत्कालीन वाहने जाण्यास पाच मीटर रस्ता खुला ठेवण्याची सूचना केली होती.

त्याचप्रमाणे, चतुर्थीच्या वेळी आठवडाभरासाठी नवीन केटीसी बसस्थानकाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दुचाकी व चारचाकीसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, केटीसीला म्हापसा पालिकेने पत्र लिहिले आहे.

Mapusa Municipality
Sanjay School Porvorim: संजय स्कूलमधील 'त्या' दिव्यांग विद्यार्थ्याला सरकारने 50 लाख नुकसानभरपाई द्यावी; DRAG ची मागणी

म्हापसा नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, उपनगराध्यक्ष विराज फडके हे हजर होते. तर, नगरसेवक अ‍ॅड. शंशाक नार्वेकर व नगरसेविका कमल डिसोझा या गैरहजर राहिल्या.

तसेच, जे.के. वाईन्स ते नास्नोडकर दुकानपर्यंत चतुर्थीच्या माटोळी बाजारासाठी ही समर्पित लेन असेल. या माटोळी बाजारात फळ व भाजीपाला विक्रेत्यांना मनाई असेल.

तर, फटाक्यांच्या स्टॉल्सना टॅक्सी स्टँडसमोर व्यवस्था असेल. त्याशिवाय पालिकेचे कर्मचारीच माटोळी बाजाराचा सोपो गोळा करेल, असे ठराव घेण्यात आले.

Mapusa Municipality
Goa Dengue Cases: गोव्यात ऑगस्टमध्ये आढळले डेंग्युचे 3000 हून अधिक संशयित रूग्ण; 80 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट

बैठकीतील काही महत्त्वाचे मुद्दे

  • न्यायप्रविष्ठ प्रकरणे हाताळण्यासाठी म्हापसा पालिकेस वकिलाची गरज असल्याने पालिका मंडळाने कंत्राटावर महिला वकिलाची नियुक्त केली. त्यांना महिना ३० हजार रुपये व वाहतुकीचे वेगळे १० हजार रुपये मानधन देणार.

  • शहरात पुन्हा अतिक्रमण व विक्रेते ठिकठिकाणी दिसत आहेत, याकडे नगरसेवक साईनाथ राऊळ व केयल ब्रागांझा यांनी लक्ष वेधले.

  • भेळपुरीच्या गाड्यांना टेम्पो स्टँडवरून हटविण्याची सूचना केयल यांनी केली. याविषयी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून अतिक्रमणांवर कारवाई करू, असे आश्वासन नगराध्यक्षांनी मंडळास दिले.

  • पालिका मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हापसा सार्वजनिक गणपती पूजला जातो. चतुर्थीच्या काळात या प्रवेशद्वाराच्या रंगरंगोटीचा खर्च यंदाही पालिकेकडून उचलला जाईल. यासाठी १.७८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या ठरावाला मंडळाने मंजुरी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com