Goa Municipality: म्हापसा येथील पालिका मंडळाने आपल्या विशेष बैठकीत प्रभाग 1 ते प्रभाग 10 मधील घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदार एजन्सीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा ठराव घेतला. मागील मंडळ बैठकीतही याच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली होती.
म्हापसा पालिकेने शहरातील प्रभाग 1 ते प्रभाग 10 च्या घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी कंत्राटदाराबरोबर करार केला होता. हे कंत्राट 10 ऑगस्ट 2021 मध्ये एका वर्षासाठी देण्यात आले होते.
या कंत्राटदाराची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपली होती आणि त्यानुसार पालिका मंडळाने कंत्राटदाराला 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली होती आणि आता आणीबाणीची स्थिती असल्याने पुढील मुदतवाढीचा निर्णय घेण्यासाठी हा विषय पुन्हा मंडळासमोर ठेवला आहे, असे म्हापसा पालिका नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी आज मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले.
तसेच, त्यानंतर आणखी दोन महिन्यांसाठी याच कंत्राटदार एजन्सीला मुदतवाढ देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. कंत्राटदार कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा उचलत आहे का? असा सवाल नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी इतर नगरसेवकांनी कंत्राटदाराच्या कामावर संतुष्टता दाखवत समाधान व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.