Dharma Chodankar: सर्वांनी सहकार चळवळ फुलवावी

Dharma Chodankar: बार्देश बाजारतर्फे म्हापशात सहकार सप्ताह
Dharma Chodankar | Goa News
Dharma Chodankar | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Dharma Chodankar: स्वातंत्र्यानंतर समाजातील सर्व थरातील लोकांना अन्नधान्य सुरळीतपणे मिळावे या हेतूने पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी सहकार चळवळ सुरू केली. त्यामुळे कित्येक सहकारी सोसायट्या स्थापन झाल्या.

याची मूळ प्रेरणा भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती. ते सहकार चळवळीचे जनक आहेत. म्हणून त्यांच्या जन्मदिनी सहकार सप्ताहाची सुरवात होत आहे. सर्वांनी या सहकार चळवळीचे पाईक होऊन ही चळवळ फुलवावी, असे मनोगत माजी आमदार तथा बार्देश बाजारचे चेअरमन धर्मा चोडणकर यांनी व्यक्त केले.

सोमवारी बार्देश बाजारच्या मुख्य कार्यालयात सहकार सप्ताह प्रित्यर्थ ध्वजारोहण करून पं. नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केल्यावर ते उपस्थितांसमोर बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत शेटगावकर, संचालक महादेव नाटेकर, एकनाथ नागवेकर, नारायण राटवड, आर. एन. देसाई, शशिकांत कांदोळकर, बापू तुयेकर, सरव्यवस्थापिका संजना राऊत उपस्थित होत्या.

Dharma Chodankar | Goa News
Vijai Sardesai on Ration Scam : गोव्यात लुटारुंसाठी 'All is Well'; धान्य घोटाळ्यावरुन सरदेसाईंची बोचरी टीका

धर्मा चोडणकर म्हणाले की, 15 नोव्हेंबर सायंकाळी बार्देश बाजारच्या प्रांगणात सहकार सप्ताहाचा दुसरा दिवस साजरा करण्यात येणार असून आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

बार्देश बाजारचे संस्थापक माजी केंद्रीयमंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. तसेच नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, स्थानिक प्रभागाचे नगरसेवक सुधीर कांदोळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com