

Mapusa Police: म्हापसा शेळपे परिसरातील पीटर मिस्किता यांच्या मालकीच्या बंगल्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने चालणारा कॅसिनो जुगार अड्डा स्थानिक पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. छाप्यावेळी पोलिसांनी मोबाईल फोन व लॅपटॉप वगैरे साहित्य जप्त केलंय.
याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी 9 जणांना अटक केली असून संशयित हे छत्तीसगड, मध्यप्रदेश व बिहारमधील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
त्यांच्याकडून 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ज्या बंगल्यात हा जुगार चालला होता तो बंगला भाडेपट्टीवर देण्यात आलेला असल्याचेही समोर आलंय.
या घटनेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नवे पुढील प्रमाणे- पंकज कुमार नागवंशी, (वय 22 वर्षे, छत्तीसगड); अंशगिरी गोस्वामी (वय 19 वर्षे, निंग) राहुल जगतराम ठाकूर, (वय २३ वर्षे, छत्तीसगड) प्रतीक सुरेश बघेल, (वय २२ वर्षे, छत्तीसगड) मोहम्मद अहमद फजलुल हक (वय 27 वर्षे, भिलाई, छत्तीसगड) प्रकाश सुंदरलाल मार्था वय 30 वर्षे, छत्तीसगड.) राजा मनोजकुमार भरमा (वय 19 वर्षे) बिंकेश सीताराम भीमटे, (वय ३० वर्षे, मध्य प्रदेश); डेव्हिड मोहनलाल साहू (वय 24 वर्षे, छत्तीसगड)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.