Goa Liquor Seized: कोल्हापुरात गोवा बनावटीचे 5 लाखांचे मद्य जप्त; सावंतवाडीच्या युवकाला अटक
Goa Liquor Seized In KolhapurDainik Gomantak

Goa Liquor Seized: कोल्हापुरात गोवा बनावटीचे 5 लाखांचे मद्य जप्त; सावंतवाडीच्या युवकाला अटक

Kolhapur News: कारमधून विविध ब्रँडच्या ७५० मिलीचे ४० बॉक्स, १८० मिलीचे ३५ बॉक्स मद्य जप्त करण्यात आले.
Published on

कोल्हापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गोवा बनावटीचा मोठा मद्यसाठ जप्त केला आहे. चारचाकीत लपवून मद्याची तस्करीचा प्रयत्न उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. याप्रकरणी सावंतवाडी येथील २१ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. हॉकी मैदान ते सायबर चौक रोडवर शनिवारी (०१ फेब्रुवारी) पहाटे ५.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

डॅरेल आलेक्स फर्नांडिस (वय २१, रा. आजगाव, शिरोडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या कारमधून विविध ब्रँडच्या ७५० मिलीचे ४० बॉक्स, १८० मिलीचे ३५ बॉक्स आणि बलेनो कार असा एकूण १० लाख ०६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापैकी केवळ मद्याची किंमत ०५ लाख ०६ हजार ४०० रुपये एवढी आहे.

Goa Liquor Seized: कोल्हापुरात गोवा बनावटीचे 5 लाखांचे मद्य जप्त; सावंतवाडीच्या युवकाला अटक
Goa Tourism: विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारच्या हालचाली सुरु, केंद्राकडे करणार मोठी मागणी

उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांना मद्य तस्करीबाबत शुक्रवारी गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉकी मैदान ते सायबर चौक रोडवर सापळा रचला. दरम्यान, समोरुन येणाऱ्या संशयित चारचाकी त्यांनी तपासणी केली असता चारचाकीच्या सीटखाली, डिग्गीत मद्याचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी मद्यसाठा बाहेर काढून संशयित चालकाला अटक केली.

Goa Liquor Seized: कोल्हापुरात गोवा बनावटीचे 5 लाखांचे मद्य जप्त; सावंतवाडीच्या युवकाला अटक
Goa News: हृदयद्रावक! काकोडा येथे साळावलीच्या कालव्यात बुडून दोन, 2 वर्षीय बालकांचा मृत्यू

संशयितावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणात आरोपीचे आणखी साथीदार आहेत का? हा मद्यसाठा कोठे पुरवठा करणार होता? याबाबत पोलिस तपास करतायेत.

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर शहरचे निरीक्षक रोहिदास वाजे, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, सरीता पाटणे, जवान राहूल गुरव, गणेश सानप, पंकज खानविलकर यांनी ही कारवाई केली. निरीक्षक सत्यवान भगत याप्रकरणाचा अधिक तपास करताहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com