Goa Lokotsav 2024: 26 जानेवारीपासून रंगणार लोकोत्सवाची धूम; 18 राज्ये होणार सहभागी

Goa Lokotsav 2024: कला जीवनाला समृद्ध करत असते. मन प्रफुल्लित करत असते.
Goa Lokotsav 2024
Goa Lokotsav 2024

Goa Lokotsav 2024: कलाकारांना, हस्तकारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी गोव्यात लोकोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

यंदा हा महोत्सव 26 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत पणजीत होणार असल्याची माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलीय.

कला आणि संस्कृती संचालनालय (DOA), पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दर्या संगम, कला अकादमी येथे हा महोत्सव रंगणार असून या महोत्सवात 550 स्टॉल असून 18 राज्ये त्यांची संस्कृती कला सादर करणार आहेत.

तसेच राज्यातील 20 ग्रुप्सही यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या लोकोत्सवासाठी 5 मजली स्टेज उभारण्यात येणार असल्याचेही गावडे यांनी सांगितले.

Goa Lokotsav 2024
PM Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फेब्रुवारीत गोवा दौरा; मंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती

आदर्श ग्रामात 2025 सालापासून 365 दिवस कायमस्वरूपी लोकोत्सव भरवण्यात येईल. तसेच 2024 साली होणाऱ्या लोकोत्सवात राष्ट्रपती तर 2025 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येईल, अशी घोषणा 2023 साली सभापती रमेश तवडकर यांनी घोषणा केली होती.

सुंदर अशा कलात्मक रंगमंचावर विविध राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण लोककलांचे, लोकसंगीताचे सादरीकरण आणि वैविध्यपूर्ण हस्तकलांचे स्टॉल्स यांनी बहरलेल्या लोकोत्सवाला नेहमीच गोवेकर गर्दी करत असल्याची चित्र आहे.

त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाचाही लोकोत्सव मोठ्या दिमाखात साजरी होणार असल्याचे सांगितले जातेय.

भारतीयत्वाचा आधारस्तंभ

कला जीवनाला समृद्ध करत असते. मन प्रफुल्लित करत असते. लोकोत्सव हा लोकमनाची जीवंतता आहे. तन-मनाने ज्यावेळी आपण कलाकार होतो, त्यावेळीच अशाप्रकारचे लोकोत्सव होऊ शकतात.

सभ्यता, भाषा, पेहराव यामध्ये जरी भिन्नता असली तरी विविधतेतून एकता दिसून येत आहे. हा लोकोत्सव भारतीयत्वाचा आधारस्तंभ असल्याचे विचार राज्यपाल मिश्र यांनी मागील वर्षीच्या लोकोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मांडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com