Goa Corona Update: गोव्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज अधिक

 Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात आज दिवसभरात नोंद झालेल्या नव्या कोरोना बाधित रूग्णांपेक्षा अधिक कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 156 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 179 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 54 हजार 687 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 49 हजार 812 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.09 टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनामुळे 3,957 रूग्ण दगावले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 1,112 प्रयोगशाळा नमुने तपासले आहेत.

 Goa Corona Update
Calangute: पर्यटकाच्या अपहरण प्रकरणी दोघांना अटक, पर्यटकाची सुटका

देशात 15,754 कोरोना रूग्णांची नोंद, 47 मृत्यू

देशात देखील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 15,754 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 47 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 01 हजार 830 रूग्ण उपचाराधीन आहेत.

 Goa Corona Update
Durand Cup: एफसी गोवाचा पहिला विजय, एअर फोर्सवर निसटती मात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com