गोव्यातील चिकन विक्रेते देणार घरपोच सेवा  

chicken
chicken
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona patient) वाढत असल्याने कुर्फ्यू (Curfew) लावला आहे. त्यामुळे राज्यातील बाजारपेठ (Market) बंद आहेत. तसेच तौक्ते चक्रीवादळानमुळे राज्यात झालेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे घरातील फ्रीज तसेच पंखे बंद असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची पाळी आली आहे. तरीसुद्धा पणजीमधील ग्राहकांची (customers) कोंबडयाच्या (chicken) मागणीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळेच ग्राहकांची मागणी (Customer demand) पूर्ण करण्यासाठी व्यापारांनी पांढऱ्या मासांची (chicken)  घरपोच सेवा (Home delivery) सुरू केली आहे. (Goa lockdown: Meat sellers now offers home delivery service)

इतर राज्यांमधून चिकन पुरवठा करणारे दररोज मालाच पुरवठा करतात. म्हणून पणजीतील व्यापारांनी मासांची घरपोच सेवा देण्याचा संकल्प केला आहे. पणजीतील चिकन विक्रेते 'अल्फ्रेडो डायस' सांगतात की, जे ज्येष्ठ नागरिक घरातून बाहेर जाऊ शकत नाहीत आणि हॉटेलमध्ये जाऊ शकत नाहीत असे लोक आमचे मुख्य ग्राहक आहेत. अशा ग्राहकांसाठी आम्ही घरपोच सेवा सुरू केली आहे.   

राज्यात चक्रीवादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच कोविड कर्फ्यूमुळे लोक घरबाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे लोकांनी रेफ्रिजरेटरमध्ये मास साठवून ठेवायला सुरुवात केली आहे. या कारणामुळेच चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी पणजीतिल व्यापारांनी पार्सल सेवेसोबत करार केला आहे. असे पणजी आणि तळेगाव येथील ग्राहकांना वैयक्तिकरित्या घरपोच सेवा देणारे चिकन विक्रेते सल्हाउद्दीन शेख यांनी माहिती दिली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant supports Jit Arolkar in Mandrem
Goa Assembly elections 23 constituencies
Canacona Silent Protest
 Yuri Alemao Girish Chodankar