LLB Exam: बीए-एलएलबीच्या फेरप्रवेश परीक्षेबाबत विद्यापीठाचा 'महत्वाचा' निर्णय, 180 विद्यार्थ्‍यांना मिळालाय दिलासा

गोमन्तकचे वृत्त ठरले खरे : अखेर परिपत्रक मागे
LLB Exam
LLB ExamDainik Gomantak
Published on
Updated on

LLB Exam बीए-एलएलबी अभ्‍यासक्रमासाठी यापूर्वी घेतलेल्‍या परीक्षा प्रक्रियेत घोळ झाल्‍याचे उघडकीस आल्‍यानंतर गोवा विद्यापीठाने ही संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच रद्द करत 6 ऑगस्‍ट रोजी नवीन प्रवेश परीक्षा घेण्‍याचा जो आदेश जारी केला होता, तो मागे घेतल्‍याचे नवे परिपत्रक आज जारी केले आहे. विद्यापीठाच्‍या या निर्णयामुळे या अभ्‍यासक्रमात प्रवेश घेतलेल्‍या 180 विद्यार्थ्‍यांना दिलासा मिळाला आहे.

गोवा विद्यापीठाचे कुलसचिव व्‍ही. एस. नाडकर्णी यांनी आज नव्‍याने परिपत्रक जारी करताना शिक्षण सचिवांच्‍या आदेशानुसार 6 ऑगस्‍ट रोजी घेण्‍यात येणार असलेली प्रवेश परीक्षा रद्द करण्‍यात आली असून ती परीक्षा न घेताच या अभ्‍यासक्रमासाठी यंदाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्‍यात येईल असे सूचित केले आहे.

LLB Exam
Goa Police: बाल लैंगिक शोषणप्रकरणी ऑपरेशन ‘सुरक्षा’ अंतर्गत पाचजणांची टोळी गजाआड

या अभ्‍यासक्रमात यापूर्वीच 180 विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला आहे, त्‍यांना परत प्रवेश परीक्षेला सामोरे जावे लागणे हा त्‍या विद्यार्थ्‍यांवर केलेला अन्‍याय असा दावा करून काही विद्यार्थ्‍यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती व विद्यापीठाने आपला आदेश मागे घ्‍यावा अशी मागणी केली होती. विद्यापीठाने ती मान्‍य केल्‍याने आता या विद्यार्थ्यांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

LLB Exam
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजचे पेट्रोल-डिझेल दर

शिक्षण सचिवांची महत्त्वाची भूमिका

शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी हा प्रश्न सोडविण्‍यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. अतिरिक्‍त विद्यार्थ्यांना सामावून घेण्‍यासाठी गोव्‍यात या अभ्‍यासक्रमासाठी ३० जागा वाढविण्‍यासाठी त्‍यांनी केंद्रीय बार कौन्‍सिलकडे केलेली मागणी मान्‍य झाली आहे.

LLB Exam
Sanguem News: डोंगरावरून गावात चिखलमिश्रित पाणी! सुळकर्णे गावात भीतीचे वातावरण, कारण गुलदस्त्यात

भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी गोवा विद्यापीठाला घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना तिसऱ्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले हे अत्यंत दुर्दैवी आहे.

- ॲड. प्रसाद नाईक, अध्यक्ष , दक्षिण गोवा वकील संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com