Goa Live Updates: मानव संसाधन महामंडळातील चोरीचा प्रयत्न फसला; सुरक्षा रक्षकांच्या सतर्कपणामुळे चोरटा ताब्यात

Goa Breaking News : गोव्यातील रोजच्या ताज्या घडामोडी
Goa Live Updates | Goa Breaking News
Goa Live Updates | Goa Breaking News Dainik Gomantak

मानव संसाधन महामंडळातील चोरीचा प्रयत्न फसला; सुरक्षा रक्षकांच्या सतर्कपणामुळे चोरटा ताब्यात

सुरक्षा रक्षकांच्या सतर्कपणामुळे गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कार्यालयातील चोरीचा प्रयत्न फसला आहे. या संबंधी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मथनी सालदान्हा या प्रशासकीय अपार्टमेंटमधील गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कार्यालयात शिरून एका चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. मात्र ड्युटीवर असणारे सुरक्षा रक्षक अजित वेळीप आणि संदेश गावकर यांनी सापळा रचत चोराला रंगेहात पकडत चोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

गोव्याची सर्वोत्तम पदकप्राप्ती; झारखंडमधील 16 पदकांच्या विक्रमाशी बरोबरी

गोव्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात झारखंडमध्ये 2011 साली 34व्या स्पर्धेत एकूण 16 पदके जिंकली होती. आता घरच्या मैदानावर सुरू असलेल्या ३७व्या स्पर्धेत यजमान पदकप्राप्तीत नव्या विक्रमाच्या दिशेने कूच करत आहेत. गोव्याने शनिवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत एकूण १६ पदके जिंकून आपल्या विक्रमाशी बरोबरी साधली. गोव्याने आतापर्यंत १ सुवर्ण, ४ रौप्य व ११ ब्राँझपदके जिंकली आहेत.

सेनादलाच्या वेटलिफ्टरला सुवर्णपदक; तर गोव्याच्या शुभम वर्मा याला रौप्य

 गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सेनादलाच्या कोजुम ताबा याने पुरुषांच्या १०२ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले. त्याला मूळ सेनादल, पण आता गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शुभम वर्मा याने जोरदार आव्हान दिले.

राज्यात यलो अलर्ट; मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

ऑक्टोबर हीटमुळे राज्यातील पारा वाढत चालला आहे. अशातच हवामान खात्याने राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 30, 31 ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

होंडा येथे ट्रक-दुचाकी यांच्यात अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

सध्या गोव्यात अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून नुकताच होंडा येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याचे वृत्त समोर येतेय. तसेच या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय तर अजून एक युवक गंभीर जखमी झाला असल्याचे समजतेय. 

नीलेश काब्राल यांच्या हस्ते उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 6 LPG सिलिंडरचे वाटप

सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते रवींद्र भवन कुडचडे येथे उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ईस्ट क्वेपेम कंझ्युमर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोबत 61 एलपीजी सिलिंडरचे वाटप केले.

Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak

गोव्याची सर्वोत्तम पदकप्राप्ती विक्रमाशी बरोबरी 

गोव्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात झारखंडमध्ये २०११ साली ३४व्या स्पर्धेत एकूण १६ पदके जिंकली होती. आता घरच्या मैदानावर सुरू असलेल्या ३७व्या स्पर्धेत शनिवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत एकूण १६ पदके जिंकून आपल्या विक्रमाशी बरोबरी साधली. गोव्याने आतापर्यंत १ सुवर्ण, ४ रौप्य व ११ ब्राँझपदके जिंकली आहेत. गोव्याने मॉडर्न पेंटॅथलॉन व पेंचाक सिलाटमध्ये प्रत्येकी ७, तर नेटबॉल फास्ट ५ व वेटलिफ्टिंगमध्ये प्रत्येकी १ पदक जिंकले आहेत.

अमेरिकेचे राजदूत एरिक यांची उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील 'नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग' प्रयोगशाळेला भेट

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील 'नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग' (NGS) प्रयोगशाळेला भेट दिली आणि तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गार्सेटी यांनी शुक्रवारी युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे (USID) भारतातील अधिकारी आणि गोवा आरोग्य विभागाच्या सदस्यांसह प्रयोगशाळेला भेट दिली.

गोव्याला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य

गोव्याच्या शुभम वर्मा याने वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या १०२ किलो वजनगटात एकूण ३२६ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. सेनादलाच्या कोजुम ताबा याने ३३० किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले. वेटलिफ्टिंगमधील गोव्याचे हे पहिलेच पदक ठरले.

National Games 2023
National Games 2023Dainik Gomantak

Mr. Universe मध्ये गोव्यातील दोघांचा डंका

महाराष्ट्रात झालेल्या Mr. Universe मध्ये गोव्यातील अयान रॉय चौधरी आणि नामवंत सावंत यांनी महाराष्ट्रात आयोजित मिस्टर युनिव्हर्स 2023 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपापल्या गटात सुवर्णपदक आणि चौथे स्थान मिळाले आहे.

राष्ट्रीय खेळांमधील घोटाळे याआधीही उघड केले आहेत : विजय सरदेसाई

राष्ट्रीय खेळांमधील घोटाळे मी याआधी उघडकीस आणले आहेत. आता खेळ चालू असल्याने मला बोलून वातावरण खराब करायचे नाही आहे. मी प्रत्येक अधिवेशनात सरकारचा पर्दाफाश केलेला आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांनी राज्यातील लोकशाही संपवली अशी टिका फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

राज्यात थंडीची चाहूल...

राज्यात पहाटे थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या चाहुलीमुळे आॅक्टोबर हीट आणि सातत्याने होणाऱ्या हवामानबदलांपासून काहीसा दिलासा मिळत आहे. राज्यात पहाटे थंडी जाणवत आहे. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात पुढील काही दिवस मोठे बदल घडण्याची शक्यता नसल्याने हुडहुडीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.

'पासची गरज नाही', राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सर्वांसाठी खुली

गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आता सर्वांसाठी खुल्या असणार आहेत. स्पर्धा होत असलेल्या सर्व ठिकाणी कोणतेही पास किंवा परवानगी न घेता प्रवेश दिला जाणार आहे. गोवा सरकारच्या क्रीडा विभागाने गुरुवारी याबाबत अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.

राज्यात 26 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय क्रीडा महाकुंभाला सुरुवात झाली आहे, 09 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाईल. प्रेक्षक गॅलरीतून नागरिकांना स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज (28 ऑक्टोबर) रंगणार 'हे' सामने...

National Games Time Table for 28 October 2023
National Games Time Table for 28 October 2023Dainik Gomantak

दूधसागर पर्यटनस्थळावर ऑनलाईन बुकींगसाठी एजंटचा सुळसुळाट! कारवाईची मागणी

 कुळे दूधसागर पर्यटनस्थळावर ऑनलाईन बुकींगसाठी एजंटचा सुळसुळाट असल्याची माहिती समोर आली आहे. हे एजंट भरमसाठ पैशाने जीपगाडी पर्यटकांना देत असल्याने पर्यटकांत नाराजी पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटकांच्या सोयीसाठी सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंग सुरु करण्यात आले आहे. बुकींगसाठी एका पर्यटकांमागे 25 रुपये ऑनलाईन आकारले जातात. बुकींगसाठी आणखी काहीही ठोस पुरावा घेत नसल्याने यामध्ये एजंटचे आयतेच फावत आहे.

ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन हे एजंट प्रत्येक पर्यटकमागे 25 रुपये प्रमाणे गाड्या बुकींग करतात. अशा एजंटमागे टॅक्सी व बस ड्रायव्हर गुंतलेले असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक काही युवक सुद्धा यामध्ये गुंतलेले आहेत.

गोव्याला आणखी एक पदक

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये गोव्याला आणखी एक पदक. पुरुषांच्या बायथल सांघिक प्रकारात गोव्याच्या संघाला ब्राँझपदक. या संघात युग दळवी, शिवनाथ माजीक व नारायण गिरी या खेळाडूंचा समावेश. स्पर्धेत मॉडर्न पेंटॅथलॉनमधील गोव्याची एकूण पदके ६, यामध्ये १ सुवर्ण, १ रौप्य व ४ ब्राँझ. स्पर्धेत गोव्याची एकूण पदके १२.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याला किती पदके?

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र 51 पदकांसह तालिकेत अव्वल असून, गोवा 12 पदकं पटकावली आहेत.

  • महाराष्ट्र - 21 सुवर्ण, 14 रौप्य, 16 कांस्य - (एकूण 51 पदकं)

  • हरियाणा - 13 सुवर्ण, 04 रौप्य, 07 कांस्य - (एकूण 24 पदकं)

  • मध्य प्रदेश - 03 सुवर्ण, 08 रौप्य, 03 कांस्य - (एकूण 14 पदकं)

  • सेवादल - 06 सुवर्ण, 05 रौप्य, 04 कांस्य - (एकूण 15 पदकं)

  • पंजाब - 03 सुवर्ण, 03 रौप्य, 08 कांस्य - (एकूण 14 पदकं)

  • आसाम - 04 सुवर्ण, 02 रौप्य, 04 कांस्य - (एकूण 10 पदकं)

  • कर्नाटक - 03 सुवर्ण, 03 रौप्य, 03 कांस्य - (एकूण 09 पदकं)

  • गोवा - 01 सुवर्ण, 02 रौप्य, 09 कांस्य - (एकूण 12 पदकं)

पत्नीच्या वादाला कंटाळून नवऱ्याने घेतला गळफास! नावेलीतील घटना

नावेलीमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या सोनूकुमार साहनी (33) या बिहारच्या युवकाने कौटुंबिक जाचाला कंटाळून आत्महत्या केली. काही कालावधीपासून पत्नी आणि त्याच्यामध्ये वाद व्हायचे ज्याला वैतागून त्याने जीवन संपवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हणजूणेत दुचाकी-चारचाकीतील बॅटरीज् होतायत लंपास

हणजूणेत चारचाकीमधील बॅटरी चोरीची घटना समोर आली आहे. दुचाकी आणि चारचाकींमधील बॅटरी चोरी झाल्याप्रकरणी अनेक तक्रारी समोर आल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1.5 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून याप्रकरणी हणजूणे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यामध्ये चोरांच्या टोळीचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शापोरा नदीतील रोइंग स्पर्धेसाठी गोव्यातील शेतकऱ्यांनी केली मदत

गोव्यात सध्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची धामधूम सुरु आहे, राज्याची राजधानी पणजीपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या शापोरा नदीजवळ रोइंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रोइंग स्पर्धेसाठी केवळ दोन दिवसात जवळपास 23 शेतकर्‍यांनी आपली जमीन मोकळी केली. तसेच, नदीपात्रापर्यंत काँक्रीटचा रस्ता बांधण्यासाठी, जमीन सपाटीकरण आणि 5,000 चौरस मीटर जमीन मोकळी करण्यास जवळपास 30,000 चौरस मीटर जमीन अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com