पास्टर डॉमिनिक डिसोझा याने सामाजिक सौहार्द आणि शांततेला बाधा पोहचवली आहे. त्याला त्याच्या पत्नीसह तडीपार करावे; अशी विनंती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
फसवणूक व बेकायदेशीर धर्मांतरण घडवून आणण्याच्या आरोपाखाली सडये-शिवोली येथील फाइव्ह पिलर्स चर्चचे धर्मगुरू डॉमिनिक डिसोझा यांना तिसऱ्यांदा म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी डॉमिनिक यांची पत्नी जोन मास्कारेन्हस व अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
CM Pramod Sawant: जे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम शिकत आहेत त्यांना दुहेरी पदवी घेण्यासाठी सरकार मान्यता देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. जे पदवी अभ्यासक्रम शिकत आहेत ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्येही नावनोंदणी करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
आगोंद किनाऱ्यावर युकेतील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. डोक्याला व स्पाइनल कॉर्डला मार लागल्याने त्या विदेशी महिलेचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे. काणकोण पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
रईश मागूस पंचायत क्षेत्रातील घरांना गेल्या आठवडाभरापासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून गुरुवारी स्थानिकांचा रोष पाहायला मिळाला. वेरे ग्रामस्थांसहित स्थानिकांनी पंचायतीवर अक्षरशः धडक मोर्चा दिला.
स्थानिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वॊर्ड मेम्बर आणि सरपंच गैरहजर असल्याने आणि उपस्थित असलेल्या सचिवांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थता दाखवल्याने स्थानिकांच्या संतापाची तीव्रता अधिकच वाढलेली पाहायला मिळावी.
सध्या राजधानी पणजीत धीम्या गतीने सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाला गोवेकर वैतागले असून स्मार्ट सिटीच्या कामामुळे जे अपघात झालेत त्यामुळे लोकांनी तीव्र शब्दांत संताप देखील व्यक्त केलाय.
पीपल्स स्कूलजवळील जीवघेण्या अपघातामुळे कामकाजाच्या बाबतीत प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरु असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटल्या.
'यापुढे अभयारण्य क्षेत्र किंवा इतर जंगलात आग लागणार नाही याची काळजी घेतली जाणार असून आगीचा वणवा विझविण्यासाठी फॉरेस्ट टीम सोबतच ट्रेकर्सना प्रशिक्षण देऊन जास्ती जास्त मनुष्य बळ तयार केले जाणार असल्याची माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिलीय. वनखात्यातर्फे वाळपई वन प्रशिक्षण केंद्र आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे साखळी आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच. सरकारने ठोस धोरण जाहीर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा.
मोरजी किनारी आतापर्यंत तीन सागरी कासवांनी अंडी घातली. 27 डिसेंबरला कासवाने 98, 2 जानेवारीला एका कासवाने 101 तर दुसऱ्या कासवाने 91 अंडी घातली. दरम्यान त्यांना 24 तास सुरक्षा देण्याचे काम सुरू आहे.
म्हापसा नगरपालिकेच्या ताब्यातील स्थावर मालमत्ता अर्थात दुकानांच्या भाडेपट्टीत वाढ करून साबांखाच्या दरानुसार नवीन सुधारित दर 296 रुपये प्रती चौरस मीटर करण्यात आले होते. मात्र या निर्णयास व्यापारी संघटनेने जोरदार विरोध केला असून याविषयी व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष यांना निवेदन दिले. आणि हा निर्णय येत्या ८ दिवसांत मागे न घेतल्यास बाजारपेठेसह म्हापसा शहर बंद करण्याचा दिला इशारा.
फसवणूक आणि बेकायदेशीर धर्मांतरण घडवून आणण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या डॉम्निक डिसोझा याला म्हापसा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
गोव्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. परिणामी काल (बुधवार, 3 डिसेंबर) काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. मडगाव, बाणावली, कोलवा तसेच नावेली भागात अचानक पाऊस सुरू झाला.
North Goa ₹ 97.54
Panjim ₹ 97.54
South Goa ₹ 97.11
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 90.10
Panjim ₹ 90.10
South Goa ₹ 89.68
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.