सांगे वरकटो येथे भरधाव अल्टो कार विजेच्या खांबाला धडकल्याची घटना रविवारी रात्रौ 10. 15 च्या सुमारास घडली. या कारमधून चौघेजण प्रवास करतअसल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात कारमधली 10 वर्षांची मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी स्थानिकांनी सांगे आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. चालक किरकोळ जखमी झाला आहे.
खोर्ली ओल्ड गोवा येथे एका परप्रांतीयांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर येतेय. ही व्याकळती आसामची असून सध्या भाडेतत्वावर खोली घेऊन ते खोर्ली ओल्ड गोवा येथे राहत असल्याचे समजतेय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे.
भोमा गावातून महामार्ग गेल्यास काही लोकांची घरे, दुकाने तसेच ग्रामदेवतेच्या देवळाला धोका पोहोचण्याची ग्रामस्थांना भीती असून सरकारी अधिकारी ग्रामस्थांनी पर्याय दिलेला असतानाही अधिकारशाही चालवत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
या सर्वातून सुटका व्हावी तसेच देवस्थान आणि घरांना नुकसान पोहोचू नये यासाठी सरकारी अधिकारी, स्थानिक आमदार व पर्यायाने सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी भोमा येथील ग्रामस्थानी आज भोमा येथील नागझरकर देव तसेच फार्मागुडी येथील कटमगाळ दादाला गाऱ्हाणे घातले.
म्हापसा-शिवोली मार्गावरील झेवियर कॉलेज रोडवर इलेक्ट्रिक दुचाकी आणि अँप टॅक्सी मध्ये अपघात झालाय.
गोव्यावरील एकूण कर्ज 35 हजार कोटींवर गेले आहे. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी IANS शी बोलताना, राज्य सरकारने विशेषत: सरकारी कार्यक्रम, प्रचार आणि रोड शोवर होणारा फालतू खर्च थांबवावा, असा टोला लगावला आहे.
गोव्याला दोन वर्षांनंतर कर्ज घेण्याची गरज भासणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नऊ महिन्यांपूर्वी सांगितले होते. तथापि, आता गोव्यावरील एकूण कर्ज 35 हजार कोटींवर गेले आहे. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
झर्मे सत्तरी येथील निकीता गावस आणि विमल गावस या दोन गरीब कुटुंबांचे जुने मातीचे घर पडले होते. पंचांकडून ही माहिती पर्येच्या आमदार देविया राणे यांना कळल्यावर त्यांनी यात पुढाकार घेत स्वतःच्या पैशातून एका महिन्यात दोन घरे बांधून दिली आहेत. नुकतीच ही घरे गावस कुटूंबियांना सुपूर्द करण्यात आली.
गोव्यातील सुप्रसिद्ध बीच असलेल्या बागा आणि कळंगुट येथील किनारे नववर्षाच्या पार्श्वभुमीवर गर्दीने फुलले असले तरी ही गर्दी गतवर्षीपेक्षा अर्धीच आहे, असे मत येथील व्यावसायिक व्यक्त करत आहेत. नियमित येणाऱ्या पर्यटकांमध्ये घट झाल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.
रविवारी नवीन वर्षाच्या रात्री कळंगुटमध्ये लोकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. पण, या इयर एंडला तुलनेत कमी गर्दी दिसून येत आहे, असे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक सांगतात. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दाबोळी चिखली माटवे व्हडले भाट परिसरात 50 दिवस पूर्ण होण्यास आले तरी, झुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीचे भूमिगत इंधन वाहिनीतील पेट्रोल-डिझेल मिश्रित इंधन अजूनही मोठ्या प्रमाणात सापडत आहे. त्यामुळे व्हडले भाट परिसरातील विहिरी व शेत जमिनी प्रदूषित झाल्या आहे.
मोरजी किनारी ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत 27 रोजी एका सागरी कासवाने 98 अंडी घातली. त्याला वन्य विभागाने सुरक्षा दिलेली आहे. या किनाऱ्यावर संगीत पार्ट्यांवर निर्बंध असूनही त्या सुरूच असतात.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त गोवेकरांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगालमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत पर्यटकाचे नाव दीपू चौधरी (४०) असे आहे. हा पर्यटक कोलवा येथील टुरिस्ट गेस्ट हाउसमध्ये उतरला होता.
North Goa ₹ 98.08
Panjim ₹ 98.08
South Goa ₹ 97.41
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 90.62
Panjim ₹ 90.62
South Goa ₹ 89.97
ध्वनी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या पथकाने पहिल्याच दिवशी मुख्य मंचावरील कार्यक्रम बंद पाडून दणका दिल्यानंतर उर्वरित दोन दिवसांत आवाजाची मर्यादा ओलांडण्याचे धाडस ‘सनबर्न’ आयोजकांनी केले नाही. गेल्या 17 वर्षांत अशा कारवाईला सामोरे जावे लागले नसल्याने निर्ढावल्याचे वातावरण होते, त्याची हवा या कारवाईने काढली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.