पणजी बेती फेरी धक्क्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. व्यक्तीचे वय 40 ते 45 असण्याची शक्यता. पोलिस पुढील तपास करीत आहे.
राज्यातील वाघांच्या अस्तित्वाचे पुरावे वेळोवेळी मिळाले आहेत पण सरकार याबाबत अनभिज्ञ. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने गोव्याला दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास देखील सरकार अपयशी ठरले. वन खात्याने जारी केलेल्या पत्रका संदर्भात पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र आर्लेकर यांनी आज (29 ऑक्टोबर) 'गोमन्तक टी. व्ही'ला प्रतिक्रिया दिली.
पणजी जिमखाना येथे झालेल्या रणजी ट्रॉफी प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्यात गोव्याने नागालँडचा 83 धावांनी पराभव केला. गोव्याचा हा सलग तिसरा विजय आहे. गोव्याच्या या विजयात दर्शन मिसाळ 5 आणि राहुल मेहताने प्रत्येकी 4 बळी घेतले.
म्हापसा बाजारात बेळगाव येथील असिफुलहा हजरतअली कार्गुतली नावाच्या व्यापाऱ्याला केळीवर विषारी रसायन इथापोन फवारणी करताना रंगेहाथ पकडले. संबंधित केळीचे नमुने जप्त केले असून, सुमारे 9 क्विंटल माल केला नष्ट करण्यात आल्याचे एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांनी सांगितले.
आमदार कार्लुस अल्वारेस फेरेरा यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. ज्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांनी आता गोमंतकीयांना आवाहन केलं की, या अकाऊंटवर कोणीही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका. ते माझे अकऊंट नाहीये. तसेच, त्या फेक अकाऊंटवरुन रिक्वेस्ट आली तर ती स्वीकारु नका.
International Film Festival ची तयारी जोरात चालू आहे. यावर्षी आम्ही पर्यावरण पूरक IFFI करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम 17 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करणार अशी माहिती: सिद्धेश विनायक देसाई यांनी दिली.
शिक्षक नोकरी घोटाळा प्रकरणातील सह-आरोपी सुनीता शशिकांत पावसकर (56, तिवरे-फोंडा) हिला सोमवारी (28 ऑक्टोबर) रोजी अटक करण्यात आली होती. पण त्यानंतर तिला फोंडा JMFC ने सशर्त जामिनावर मुक्त केले आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री सचिन कल्याणशेट्टी यांच्याबरोबर अक्कलकोटला पोहोचले. यावेळी त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्र्यांनी दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सची भेट घेतली आणि त्यांना GTDC सह पर्यटन सुरु करण्यास सांगितले. तसेच, कोणतीही अडचण आल्यास महिन्याभरात जीटीडीसी काउंटर बंद करेल असे आश्वासनही दिले. यावर सुदीप ताम्हणकर म्हणाले की, ''जीटीडीसी आणि गोवा टुरिझमने गोव्यातील प्रमुख व्यवसाय संपवले. आमदार गणेश गावकर आणि मुख्यमंत्र्यांनी स्थानिक समस्या समजून घेवून त्या सोडवाव्यात.''
गेल्या तीन दिवसांपासून बोर्डे-डिचोली येथे उंच झाडावर अडकलेल्या मांजरीची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका.
राज्यात गेल्या 24 तासांत पणजीत सर्वाधिक मि.मी. पावसाचा नोंद झालीये. म्हापसा 16.2 मि.मी., पेडणे 17.4 मि.मी., फोंडा 2.8 मि.मी., जुने गोवा 49.4 मि.मी., साखळी 33.6 मि.मी., वाळपई 1.1 मि.मी., काणकोण 19.2 मि.मी., दाबोळी 1.0 मि.मी., मडगाव 0.8 मि.मी., मुरगाव 22.4 मि.मी., केपे 0.0 मि.मी., सांगे 5.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.
सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रोजी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) ने कळंगुट परिसरातून ३,००० किलोग्रॅम निकृष्ट दर्जाचे काजू जप्त केले. रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली राजाराम पाटील, लेनिन डी सा, माधव कवळेकर, साफिया खान आणि विश्वास राणे यांच्यासह वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी आणि FDA संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.