पालमरिन्हा रिसॉर्ट, कळंगुट येथे पोलीसांनी ग्राहकांना अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या अश्रू भीमा काळे (वय 28, उस्मानाबाद महाराष्ट्र) याला ताब्यात घेत त्याच्याकडून 960 ग्रॅम वजनाचा 96,000 हजार किमतीचा अंमली पदार्थ जप्त केलाय. NDPS Act 1985 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राजकीय आरक्षण नसल्याने गोव्यातील एस्टींवर गेली 20 वर्षे अन्याय. पुढील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एस्टींना राजकीय आरक्षणासाठी डिलिमीटेशन आयोग स्थापण्याचा ठराव घेणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच गोव्याच्या शिष्ठमंडळाला आश्वासन.
थिवी रेल्वे स्टेशनजवळ अंमली पदार्थांवर धाड टाकून दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. प्रभुदत्त त्रिपाठी (वय 28, ओडिशा) आणि श्याम सुंदर सिंग (वय 23,ओडिशा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 5.10 किलोग्रॅम वजनाचा सुमारे 5 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय.
हणजूणमधील अनिल मडगावकर यांच्या मालकीच्या ले गाला रिसॉर्टमधील बेकायदा बांधकामावर प्रशासनाचा हातोडा. बांधकाम नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांची कारवाई. 20 कॉटेज आणि एक रिसेप्शन काउंटर तसेच ग्राउंड प्लस वन फॅब्रिकेटेड रेस्टॉरंट जमीनदोस्त
राज्यातील बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्यासाठी सरकार कायदा आणणार असून राज्यात गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ 25 हजाराहून अधिक बेकायदेशीर घरे आहेत. त्यापैकी 80% घरे गोवेकरांची तर 20% बिगरगोवेकरांची असल्याची माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिलीय.
गोवा प्रदेश काँग्रेस वेदांता लिमिटेड खाण कंपनीच्या विरोधात आक्रमक.खाण संचालनालयावर धडक. १६५ कोटींची थकबाकी असताना वेदांताला निर्यात परवाना दिलाच कसा? खाणींच्या बाबतीत गोवा सरकारच्या मंत्रीमंडळाने घेतलेले निर्णय मागे घ्यावेत अन्यथा कोर्टात जाणार.कॉंग्रेसचा इशारा.
खाण क्षेत्रातील लोडींग पॉईंटवरील अतिक्रमणे हटवा. आमची जमीन आम्हाला द्या. संघटित झालेल्या पिळगावमधील सारमानस भागातील लोकांची मागणी.
मुरगाव जेटीजवळ बस आणि दुचाकीमध्ये अपघात. यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून त्याला सध्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय चिखली येथे दाखल करण्यात आले आहे.
15 वर्षांहून अधिक काळ रोजंदारीवर असलेल्या 40 ईएसआय कामगारांना कंत्राटी पध्दतीवर घेणार. डिचोलीत लिलाव झालेल्या खाण ब्लॉकसाठी वेदांतसोबत सरकार खाण विकास आणि उत्पादन करार करणार. मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय, मुख्यमंत्र्यांची माहिती.
साखळीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड विद्यूत केबलींगच्या कामामुळे जलवाहिन्या फोडण्याचे सत्र सुरूच आहे. देसाईनगर भागाला आतापर्यंत या कामाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. काल पुन्हा देसाईनगर येथे जलवाहिनी अंडरग्राउंड केबलींगच्या कामामुळे फोडली. त्यामुळे या भागातील लोकांचे पाण्याविना हाल झाले. पुन्हा नागरिकांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
सां जुझे द आरियल येथे 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन. गावकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची केली मागणी.
खाण खात्याच्या संचालकांना भेटण्यास निघालेल्या काँगेस शिष्टमंडळाला पोलिसांनी अडवले. खाण कंपन्यांकडून येणाऱ्या थकित करवसूली करण्यात सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ शिष्टमंडळ संचालकांना भेटणार होते.
म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षपदी डॉ. नूतन बिचोलकर यांची बिनविरोध निवड. सत्ताधारी गटातील संगीत खुर्चीमुळे मागील तीन वर्षात पालिकेला लाभला तिसरा नवीन नगराध्यक्ष.
कांपाल इनडोअर स्टेडियमजवळ मांडवीत सापडलेला मृतदेह दुचाकीस्वार जावेद सडेकरचा नाही. मृतदेह मालिम जेटीवर काम करणाऱ्या मजुराचा असल्याचे उघड. सुरजीत सहाय असे मृत मजुराचे नाव. तो तीन दिवसांपासून बेपत्ता होता.
मये देवूस-भटवाडी येथे पुन्हा नव्या रेड्याच्या कळपाचे दर्शन. डिचोली ते चोडण फेरी प्रवास करणाऱ्यांनी व्यक्त केली चिंता. काही दिवसांपूर्वी मये तलावाजवळ एका व्यक्तीवर गव्याकडून झाला होता हल्ला. पंचायतीला कळवूनही काहीच हालचाल नाही. गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी.
कांपाल इनडोअर स्टेडियमजवळ मांडवीत सापडला एका पुरुषाचा तरंगता मृतदेह. कोस्टल पोलीस, पणजी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल. हा मृतदेह काल (ता. 22) मांडवी पुलावर झालेल्या अपघातातील दुचाकी चालक जावेद सडेकर (38, हळदोणा) याचा असण्याची शक्यता असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.