Today's Goa News : दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa's Latest News in Marathi (20 February 2024): पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या घडामोडी...
Today's Goa Live News (20 February 2024) | Latest News on Anjuna Bandh, Goa Mumbai Cruise, Panji and Overall Goa News
Today's Goa Live News (20 February 2024) | Latest News on Anjuna Bandh, Goa Mumbai Cruise, Panji and Overall Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघा संशयितांना न्यायालयीन कोठडी

अडीच किलो गांजा बाळगल्या प्रकरणी गावडे वाडा मोरजी येथील गोपी उर्फ गोपीनाथ गुणाजी हरमलकर व शुभम शर्मा या दोघा संशयीताना 14 दिवस न्यायालयीन कोठडी. गांजा बाळगल्या प्रकरणी आठ दिवसांपूर्वी त्यांना अटक केली होती. आज न्यायालयासमोर उभे केले असता 14 दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

कारापूर-तिस्क येथे विवाहितेची आत्महत्या

कारापूर-तिस्क येथे विवाहित महिलेची आत्महत्या. राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवनाचा शेवट. मयत महिला मूळ उत्तरप्रदेशमधील.

अस्नोडा येथील चोरी प्रकरणी मुद्देमालासह संशयिताला पोलिसांकडून अटक

अस्नोडा येथील ब्लँडाइन अल्फोन्सो यांच्या घरात घुसून सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन यासोबतच अंदाजे साडेचार लाखाचा मुद्देमाल चोरणारा संशयित तनवीर कलीम अहमद (वय 20 वर्ष, मूळ. उत्तर प्रदेश) कोलवाळ पोलिसांच्या ताब्यात. आज मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली होती चोरीची घटना. अस्नोडा बस स्टँडवरू मुद्देमालासह संशयिताला अवघ्या काही तासांत घेतले ताब्यात

Goa Mumbai Cruise: गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या क्रूझवर मेक्सिकन नागरिकाला हृदयविकाराचा झटका, समुद्रातून रुग्णाचे बचावकार्य

भारतीय तटरक्षक दलाने सोमवारी (दि.19) संध्याकाळी गोव्याच्या किनारपट्टीजवळ वैद्यकीय बचाव मोहीम राबवली. क्रूझवर मेक्सिकन नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला सुरक्षितपणे बाहेर आणून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या सेलिब्रेटी मिलेनियम या क्रूझवर ही घटना घडली, बचावकार्य करण्यात आले त्यावेळी क्रूझ किनारपट्टीपासून 40 किमी अंतरावर होते.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी एकाला अटक!

अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केलेल्या रामनगर (कर्नाटक) येथील स्नेहल निक्कम याला महिला पोलीस पथकाने अटक केली. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही तक्रार अगोदर पेडणे पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती व त्यानंतर ती महिला पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली.

'छत्रपती शिवराय माझे हिरो, त्यांच्यावरील अनेक मराठी पुस्तकं वाचलीत'

शिवजयंतीच्या विविध कार्यक्रमात हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी हिरहिरीने सहभाग घेतला. 'छत्रपती शिवराय माझे हिरो आहेत, त्यांच्यावरील अनेक मराठी पुस्तकं मी वाचलीत,' असे फेरेरा म्हणाले.

मे अखेरपर्यंत द. गोवा रुग्णालयातील कामकाज पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होणार! 

गोवा फॉरवर्ड विजय सरदेसाई आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी द. गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात ICU आणि ITU च्या ऑपरेशन्ससह 30 मे 2024 पर्यंत संपूर्ण हॉस्पिटल ऑपरेशन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अनुपालन अहवाल 20 एप्रिल 2024 पर्यंत सादर केला जाईल. विजय सरदेसाई गेल्या अधिवेशनात रुग्णालयाच्या कामकाजाचा मुद्दा अधोरेखित केला होता. याबाबत त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

कचरा विल्हेवाट संदर्भात उच्च न्यायालयाची भाटी सरपंचांना नोटीस!

राज्यातील कचरा विल्हेवाट संदर्भात स्वेच्छा याचिकेत ठराविक वेळेत कायमस्वरूपी एमआरएफ ( मटेरिअल रिकव्हरी फॅसिलीटी ) सुविधा कार्यान्वित न केल्याने उच्च न्यायालयाने भाटी पंचायतीच्या सदस्यांनी जमा केलेले 5 लाख रुपये जप्त केले व उच्च न्यायालयाने सरपंचांना अवमानाची नोटीसही बजावली, 28 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी

हणजूणमधील 175 आस्थापनांचा मुद्दा : राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

हणजूणमधील 175 आस्थापनांना सील करण्याच्या पंचायतीच्या प्रक्रियेविरूद्ध ग्रामस्थांनी 'हणजूण गाव बंद'' पाळला होता. यासंदर्भात आमदार मायकल लोबोंनी आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले की, स्थानिक पंचायत सचिवांनी चुकीची नोटीस जारी केली असून ज्यांच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि जे कायदेशीर व्यवसाय चालवितात त्यांना काहीच धोका नाही. गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करणार. पंचायत सचिवांनी चूक केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सां जुझे आरियल तणाव अन् मंत्र्यांवरील हल्लाप्रकरणी 20 जणांवर गुन्हा

काल सोमवारी (ता. 19) सां जुझे आरियलमध्ये शिवाजी महाराज पुतळा उभारणीवेळी तणाव निर्माण केल्यामुळे तसेच मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर मातीफेक केल्याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी 20 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com