हरमल येथे सायंकाळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दीड लाखाचा चरस जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणे दोडामार्ग (सिंधुदुर्ग) येथील संदेश ब्रह्मदेव नाईक याला अटक केली आहे. त्याची दुचाकीही जप्त केली आहे.
पेडणे पोलिस स्टेशनचे चे उपअधीक्षक राजेश कुमार, पोलिस निरिक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर व विवेक हळर्णकर यांनी ही कारवाई केली.
पणजीत दोन दिवसांपूर्वी पार्किंगमधील वाहनातून सुमारे 9 लाखांचे किंमती सामान वाहनाची काच फोडून लंपास करणाऱ्या हैदर खान (30) आणि निझामुदीन जालेगर (24) या चोरट्यांना फोंडा येथे पणजी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून रोख रक्कम वगळता इतर सामान जप्त केले. तिसरा संशयित फरार आहे.
खेलो इंडिया पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टी ११-१२ प्रकारात १०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकलेल्या गोव्याच्या साक्षी काळे हिने महिलांच्या लांबउडीत रौप्यपदक जिंकले. स्पर्धा नवी दिल्ली येथे सुरू आहे.
डिसेंबरच्या अखेरीस हणजूण येथे होणाऱ्या तीन दिवशीय सनबर्न फेस्टीव्हल वेळी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश प्रदूषण मंडळाला देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावणी 20 डिसेबरला ठेवली. अवमान याचिकेत सनबर्न ईडीएम फेस्टीव्हल आयोजकांना प्रतिवादी करून खंडपीठाने नोटीस जारी केली.
तम्नार या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीच्या प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या संपादनास धारबांदोडा तेथील रहिवाशानी आव्हान दिलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून त्यांना न्यायदंडाधिकार्यांकडे दाद मागण्याचे निर्देश दिले त्यामुळे या प्रकल्पासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील अवैध वाळू उपसाप्रकरणी सरकारतर्फे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांनी प्रतिज्ञापत्र सादर करून केलेल्या कारवाईचा तसेच कृती आराखडा सादर केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने समाधान व्यक्त करत अवैध वाळू उपसा संदर्भात झिरो टॉलरन्सची सूचना करून पुढील सुनावणी २९ जानेवारीपर्यंत तहकूब केली.
झुवारी कंपनीची पाईपलाईन लीकेज सापडली. वालेस जंक्शनजवळ होती लीकेज. लीकेज बंद करण्याचे काम सुरू. दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार.
तम्नार या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीच्या प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या संपादनास धारबांदोडा तेथील रहिवाशांनी आव्हान दिलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून त्यांना न्यायदंडाधिकार्यांकडे दाद मागण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या प्रकल्पासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दवर्ली येथील मस्जिदीच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मायणा-कुडतरी पोलिसांचा छापा. तीन पत्ती खेळणाऱ्या 5 जणांना अटक. जुगारातील 5000 रुपये जप्त. पुढील तपास सुरू.
टोंक-करंझाळे येथील 8 गुन्हे विविध पोलिस स्थानकात नोंद असलेल्या अट्टल गुन्हेगार सूर्यकांत कांबळे उर्फ सूर्या याच्यावर पूर्ववैमनस्यातून बुरखाधारी हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. यामध्ये सूर्या जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या हल्लेखोरांचा शोध पणजी पोलीस घेत आहेत.
राज्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये प्रामुख्याने रशियाचे पर्यटक जास्त असतात. रशियन सरकारने नागरिकांवर विदेश प्रवासावर काही कालावधीसाठी बंदी घातल्याने हे प्रवासी घटल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे.
शिरदोण येथील अॅक्टीव्हा आणि स्प्लेंडर मध्ये झालेल्या अपघातात 22 वर्षीय संजना सावंत या युवतीचा मृत्यू झाला. यामध्ये स्प्लेंडर चालकही जखमी झाला आहे. अॅक्टीव्हावर मागे बसलेली संजनाची बहीण देखील जखमी झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.