बायणा समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी (10 ऑक्टोबर) बंगळुरु येथील पर्यटक संजय श्रीनिवास यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.
पणजी मार्केटमध्ये चालणाऱ्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई. 23 जणांना पकडून 1.26 लाखांची रोकड जप्त केली.
टास्क फोर्सने कला आकादमीतील तियात्रांच्या प्रयोगांचे निरीक्षण केले आहे. टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष व इतरांची यावेळी उपस्थिती होती. निरीक्षण पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (१३ नोव्हेंबर) रोजी टास्क फोर्स समितीची आढावा बैठक होणार आहे.
सांग्यातील जुन्या म्युनिसिपल टाऊन हॉल इमारतीला उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिल्याने आता हा सभागृह पडणार नाही, अन्यथा सोमवारी (दि. ११ नोव्हेंबर) रोजी सकाळी समोर आलेल्या माहितीनुसार हि इमारत पाडली जाणार होती.
कोटवाडा-कुर्टी येथे भंगार अड्डयाचा आगीने भयंकर पेट घेतला असून अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आज सोमवारी (दि.११ नोव्हेंबर) रोजी पर्वरी येथे दुपारी १२च्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकली आहे.
लामगाव डिचोली येथे बिबट्याची दहशत वाढली आहे. भर लोकवस्तीत बिबट्याचा संचार वाढला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आत्तापर्यंत त्याने पाच कुत्र्यांना केले फस्त केले असून या बिबट्याला कैद करण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावला आहे.
संदीप जगन्नाथ परब याने सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने ५ लाख घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. संदीप परब याने दीपश्री सावंत विरोधात सुमारे ३ कोटी ८८ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची पोलिस तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन दीपश्री सावंतच्या विरोधात गौप्यस्फोट केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.