Goa News Updates: बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकाला 75 हजाराच्या ड्रग्जसह अटक

Marathi latest Updates From Goa: जाणून घ्या गोव्यात घडणाऱ्या ताज्या घडामोडी
Goa News Updates: बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकाला 75 हजाराच्या ड्रग्जसह अटक
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकाला 75 हजाराच्या ड्रग्जसह अटक

बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकाला 75 हजार किमतीच्या 8.75 ग्रॅम एमडीएमएसह अटक करण्यात आली. याशिवाय, त्याच्याकडून एक ॲक्टिव्हा आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले.

उत्तर गोव्याने 1 लाख भाडेकरु पडताळणी पूर्ण केली!

अवघ्या एका महिन्यात उत्तर गोवा जिल्ह्याने 55,026 भाडेकरु पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून, उत्तर गोव्यातील एकूण भाडेकरुंची पडताळणी 1 लाख झाली आहे: एसपी अक्षत कौशल

कॅश फॉर जॉब स्कॅम, सरकारने फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश केला!

कॅश फॉर जॉब घोटाळ्यात गुंतलेल्या लोकांचा सरकारने पर्दाफाश केला. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा घणाघात ॲड. यतीश नाईक यांनी केला.

'कबड्डी'ला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल..., आमदार चंद्रकांत शेट्ये स्पष्टच बोलले

'कबड्डी'ला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल, तर वादविरहित राज्य संघटना आवश्यक. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे स्पष्ट मत. डिचोलीत कबड्डी स्पर्धेला दिमाखात सुरवात.

सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने लोकांना कोट्यवधींना लुटणाऱ्यांमागे कोणाचा हात? पाटकरांचा सवाल

सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने लोकांना कोट्यवधींना लुटणाऱ्यांमागे कोणाचा हात आहे? याचा सूत्रधार कोण? हे समोर आलेच पाहिजे. येत्या सोमवारी कॉंग्रेस याबाबत राज्यपालांना पत्र पाठवणार असल्याचे अमित पाटकर म्हणाले.

सरकारी नोकरभरती घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी होणं गरजेचं होतं पण..., कार्लुस फेरेरांचा घणाघात

सरकारी नोकरभरती घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी. या प्रकरणांची चौकशी ईडी मार्फत होणे गरजेचे होते. पण ईडी झोपली आहे, असा घणाघात कॉंग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसानेही दीपश्रीला दिले 5 लाख; पाटकरांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या बायकोला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी जॉब फॉर स्कॅम प्रकरणात अटकेत असलेल्या दीपश्री सावंत गावंस हीला 5 लाख रुपये दिले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा पत्रकारपरिषदेत मोठा गौप्यस्फोट

कॅश फॉर जॉब प्रकरणात भाजपचा हात; कार्लोस फेरेरांचा हल्लाबोल

राज्यात मागील काही दिवसांपासून कॅश फॉर जॉब प्रकरण चांगलंच गाजत आहे. यातच, कार्लोस फेरेरा यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपवर हल्लाबोल केला. कॅश फॉर जॉब घोटाळ्यात भाजपचे कार्यकर्ते सामील आहेत. या घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी: आमदार ॲड. कार्लोस फरेरांची मागणी

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या फेरीबोटच्या कर्मचाऱ्याला अटक!

14 वर्षीय मुलीची छेड काढल्याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी फेरी बोट कर्मचाऱ्याला अटक केली. आरोपीने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला, तिचा नंबर मागितला आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोल्हापूर दौऱ्यावर!

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारासाठी कोल्हापूरात दाखल. प्रचारादरम्यान त्यांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले.

डिचोलीत कॅन्सर स्क्रिनिंग अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डिचोलीत कॅन्सर स्क्रिनिंग अभियान सुरु आहे, याअंतर्गत मोबाईल वाहनाद्वारे कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य खात्यातर्फे आयोजित या शिबिराला रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com