Goa News Updates: नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचे 'दाबोळीत' स्वागत; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi News Updates: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी...
Goa News Updates: नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचे 'दाबोळीत' स्वागत; वाचा दिवसभरातील घडामोडी
Published on
Updated on

नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचे दाबोळीत स्वागत

भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री श्री किंजरापु राममोहन नायडू यांचे आज (दि. 6 नोव्हेंबर) रोजी दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर स्वागत करण्यात आले.

मिझोरामविरुद्ध स्नेहल,मंथन आणि दीपराजने उभारली धावांची भक्कम भिंत

स्नेहल कौठणकर नाबाद 135 धावा, मंथन खुटकर 95 आणि दीपराज गावकर यांच्या नाबाद 50 धावांच्या जोरावर गोव्याने रणजी ट्रॉफी प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्यात मिझोरामविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 322/3 अशी भक्कम धावसंख्या गाठली.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता!! नोव्हेंबरमध्ये मिळणार वाढीव महागाई भत्ता

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्याच्या थकबाकीसह नोव्हेंबरमध्ये दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भात्यात 3 टक्क्यांची वाढ झाल्याने हा आकडा 50 वरून 53 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

.. आणि बोनस मिळाला! गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

गोवा फॉरवर्डने गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस न दिल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आज गोवा विद्यापीठ प्रशासनाने दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

पणजीत पुलाच्या कामामुळे मुख्यमंत्री खोळंबले

पुलाचे काम सुरु असल्याने आज (बुधवार, दि. 6 नोव्हेंबर) रोजी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा काफिला दुपारी 12च्या सुमारास पणजीतील पाटो पुलावर अडकला होता.

नोकरीत मुदतवाढ मिळवणारे 'जॉब स्कॅम' प्रकरणात सामील

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत मुदतवाढ दिली जाते, ते सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणांमध्ये सामील असल्याचा दावा आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

जमिनीच्या दरात वाढ म्हणजे गोव्यावर अन्याय!! विजय सरदेसाईंचे टीकास्त्र

जमिनीचे दर वाढवून सरकारने उत्तर गोवा परप्रांतीयांना विकला आहे. यानंतर आता सरकार दक्षिण गोव्याच्या बाबतीत देखील हेच करेल. जमिनीच्या दरात वाढ केल्यास केवळ लँड शार्क्सना फायदा होतो मात्र हा सामान्य गोवावासीयांवर होणारा संपूर्ण अन्यायच आहे. आमदार विजय सरदेसाई यांची सरकारवर टीका.

गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी अजूनही दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत

गोवा विद्यापीठातील सुमारे 348 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप दिवाळी बोनस मिळालेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने निधी दिलेला नाही. गोवा फॉरवर्ड पक्षाचे दुर्गादास कामत यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com