Goa News Updates 06 January 2024: म्हापसा येथे दुचाकी आणि खासगी बसमध्ये भीषण अपघात

Goa Breaking News 06 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...
Goa Live Updates 06 January 2023:
Goa Live Updates 06 January 2023:Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा येथे दुचाकी आणि खासगी बसमध्ये भीषण अपघात

म्हापसा बोडगेश्वर मंदिर येथे दुचाकी आणि एका खासगी बस मध्ये अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रौ 8 च्या दरम्यान घडली आहे.

बिनू पिल्लई असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मल्याळम न्यूज चॅनेलचे रिपोर्टर असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी त्यांचे पत्रकारितेचे ओळखपत्र (ID Card) सापडले असून त्यावर ही सर्व माहिती नोंदवलेली आहे.

सडये- शिवोली मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

Traffic issue
Traffic issueDainik gomantak

सडये- शिवोली येथील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या एका मिनी ट्रकावर जंगली भेंडीचे झाड पडल्याने साधारणतः तासभर वाहतूक कोंडी झाली होती.

वागातोर येथे कर्नाटक पासिंगची पर्यटकांची कार उलटली

वागातोर येथे कर्नाटकची नोंदणीकृत असलेली पर्यटकांची कार उलटल्याची घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याचे समजतेय. चालकाचा गाडीवरील ताबा सौत्रालयाने ही चारचाकी उतरल्याचे समजतेय.

वास्को दुहेरी जळीत मृत्‍यूप्रकरणी पती अनुरागला सहा दिवसांची पोलीस कोठडी

वास्कोतील दुहेरी जळीत मृत्‍यूप्रकरणी शिवानीचा पती अनुराग राजवत याला आज (6 जानेवारी) वास्को प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वास्को पोलीस स्थानकांचे निरीक्षक कपिल नायक याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

कळंगुट बागा रोडवर स्थानिक आणि पर्यटक यांच्यात मारामारी

आज पहाटे 3 वाजता कळंगुट बागा रोडवर स्थानिक आणि पर्यटक यांच्यात मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या वादामध्ये मध्यस्थी करणाऱ्या स्थानिक टॅक्सीचालकाच्या डोक्याला जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नैसर्गिक मृत्यू की हत्या? गोव्यात मृत झालेल्या मल्याळी तरुणाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण

Kerala Boy Death Mystery: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आलेल्या केरळमधील तरुणाचा वागातोर समुद्रकिनारी मृतदेह आढळून आला.

19 वर्षीय संजयच्या मृतदेहाचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामुळे संजयचा नैसर्गिक मृत्यू झाला की हत्या करण्यात आलीय याचे गूढ कायम राहिले आहे.

संजयच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या छातीच्या पुढच्या, मागच्या बाजूवर बल प्रयोग झाल्याचे ठळकपणे दिसून आले. मृत्यूपूर्वी त्याच्यावर हिंसक हल्ला झाल्याचे दिसते.

गोवा महाराष्ट्राचा जिल्हा असल्यासारखी वागणूक यापूर्वी केंद्राने दिली, मोदींनी गोव्याला दिली खरी ओळख - CM सावंत

CM Pramod Sawant: यापूर्वी गोवा महाराष्ट्राचा जिल्हा असल्यासारखी वागणूक केंद्र सरकारने दिली. पण, सध्याच्या भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याला दिली खरी ओळख मिळवून दिली, असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केले.

आज (शनिवारी, दि.06) साखळी येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

मोपा, IIT, फिल्म सिटी, स्मार्ट सिटी जबरदस्तीने लादलेले प्रकल्प घातक; 'गोंयकारानो जायात जागे', आलेमाव यांचे आवाहन

Yuri Alemao on Goa Government: मोपा विमानतळ, आयआयटी, फिल्म सिटी, 3 लिनियर प्रोजेक्ट, स्मार्ट सिटी, थीम पार्क, ओल्ड गोव्यातील घोस्ट घरे,मरिना तसेच जबरदस्तीने लादलेले इतर प्रकल्प आपल्या भावी पिढ्यांना घातक ठरतील. गोमंतकीयांनी आताच शहाणे होवून भाजप सरकारच्या प्रलोभनाला बळी पडू नये. गोंयकारानो जायात जागे, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.

रेस्टॉरंटची जाहिरात करणारा हायड्रोजनयुक्त फुगा फुटला; तिघे जखमी

Vagator: वोझरान -वागातोर येथील किनारी भागात डुबकी रेस्टॉरंटची जाहिरात करणारा हेलियमयुक्त मोठा फुगा शनिवारी सकाळी उतरवत असताना अचानक फुटल्याने तिघे कर्मचारी जखमी. जखमींवर बांबोळीच्या गोमेकॉत उपचार सुरू. डुबकीविरोधात रितसर तक्रार दाखल. हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते अस्नोड्यातील सात दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वाटप. 'स्वयंपूर्ण गोवा'अंतर्गत अस्नोडा पंचायतीचा उपक्रम.

...अन्यथा ‘पर्पल फेस्टिव्हल’मध्ये आंदोलन करणार!

Purple Festival Goa 2024: चार महिन्यांपूर्वी पर्वरीतील संजय स्कूलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका दिव्यांग विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून सेंटर बंद करण्यात आले. सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे आंदोलन. मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य न केल्यास येणाऱ्या पर्पल फेस्टिव्हलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा

वास्को दुहेरी जळीत मृत्‍यूप्रकरण; पती अनुरागला अटक

Shivani Rajawat Murder Case: शिवानी राजावत आणि तिची आई जयदेवी चौहान यांच्‍या दुहेरी जळीत मृत्‍यूप्रकरणी आरोपी अनुराग सिंग राजावतला अटक. तसेच हुंडाबळी साठी त्याच्या आईवरही गुन्हा दाखल. अनुरागवर IPC कलम 302 गुन्हा दाखल.

सुपारी काढताना लागला विजेचा धक्का! रिवणात एकाचा मृत्‍यू

Rivona Death Case: रिवण येथील एका फार्ममध्‍ये सुधाकर नागवेकर (56) यांना उच्‍च दाबाचा विजेचा धक्का लागून त्यांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. वीज वाहिन्‍यांखाली एक व्‍यक्‍ती बेशुद्धावस्‍थेत पडली होती. त्यांना मडगावच्‍या सरकारी इस्‍पितळात आणले असता त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद डॉक्‍टरांनी केली.

विकेंडला गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com