Goa News Updates: विवाहित महिलेचा गोव्यात संशयास्पद मृत्यू?

Goa Breaking News 05 January 2024 : पणजी, म्हापसा, मडगाव तसेच महत्वाच्या शहरातील ब्रेकिंग न्यूज..
Goa Live Updates 05 January 2024 | Goa Breaking News
Goa Live Updates 05 January 2024 | Goa Breaking News Dainik Gomantak
Published on
Updated on

विवाहित महिलेचा गोव्यात संशयास्पद मृत्यू?

विवाहित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पतीवर प्राणघातक हल्ला आणि हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या पतीचे गोव्यात फर्निचरचे शोरूम आहे.

याप्रकरणी विवाहितेच्या भावाने जालोरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ विरुद्ध गोमंतक मंदिर महासंघाची तक्रार; वाचा...

 फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ वारसा स्थळाच्या 100 मीटर अंतरात अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामाविरोधात गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने वेर्णा पोलिसात ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आलीय.

अनधिकृतपणे बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी देण्यात आले.

पर्रीकर कडाडले मात्र; महापौर कामाच्या ठिकाणी दाखल

पणजीत स्मार्ट सिटीची सुरू असलेल्या कामांमुळे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघाती युवकाचा झालेल्या मृत्यूनंतर उत्पल पर्रीकर यांनी महापौरांवर निशाणा साधला होता.

त्याशिवाय महानगरपालिकेच्या कामाविषयी विविध पक्षांनीही संशय व्यक्त केल्याने अखेर अपघातानंतर चार दिवसांनी महापौर रोहित मोन्सेरात आणि उपमहापौर संजीव देसाई काही अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यास रस्त्यावर उतरले.

धमकीचा ईमेल आणि पोलिसांची धावपळ, काय घडला तो प्रकार?

गोव्यातील राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयात बॉम्ब ठेवला असून, परिसर उडवून देणाऱ्या धमकीचा ईमेल संग्रहलयाला प्राप्त झाला. शुक्रवारी सकाळी हा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर गोवा पोलिसांच्या बॉम्ब निकामी पथकाने परिसराचा शोध घेतला.

ईमेल फसवा असल्याची खात्री केल्यानंतरच दुपारी संग्रहालय खुले करण्यात आले.

सोमवारी आजाद मैदानावर उस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

संजीवनी सहकारी साखर कारखाना उस उत्पादक संघटना शेतकरी दि.8 जानेवारी पणजी येथील आजाद मैदानावर आंदोलन करणार असून यात 250 शेतकरी सहभागी होणार

नवीन हिट अँड रन कायद्याबाबत 'रिफॉर्मर्स' सामाजिक न्याय गटाने केलीय 'ही' मागणी 

नवीन हिट अँड रन कायदा हा केवळ मालवाहू ट्रक ड्रायव्हर किंवा बसचालकांसाठीच मारक नाही, तर सर्वसामान्य तसेच असुरक्षित वर्गाच्या विरोधात आहे. त्याचप्रमाणे भाजपा केंद्र सरकारने आणलेला नवीन भारतीय न्यायिक संहिता व इतर कायद्यांमधील पुनर्रचना ही हुकूमशाहीला बळकटी देण्याचा डाव आहे.

या कायद्यातून सरकार लोकशाही संपवू पाहते. एकप्रकारे लोकांना भीतीखाली व नियंत्रणाखाली ठेवू पाहते. त्यामुळे सरकारने ताबडतोड हा नवीन हिट अँड रन कायदा तसेच इतर पुनर्रचना केलेले सर्व कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी रिफॉर्मर्स या सामाजिक न्याय गटाने शुक्रवारी (ता.5) म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेतून केली.

शवविच्छेदनानंतर युकेतील महिलेच्या मृत्यूचे कारण समोर...

युके येथील विदेशी महिलेचा मंगळवारी रात्री आगोंद किनाऱ्यावर मृतदेह आढळला होता. महिलेचे निधन डोक्याला व स्पायनल कॉर्डला दुखापत झाल्याने झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी रात्रीच पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर गुरुवारी शवचिकित्सा अहवाल समोर आला.

सोनिया गांधी खाजगी भेटीसाठी गोव्यात दाखल झाल्या आहेत. माहितीनुसार, त्या 7 दिवस गोव्यात असणार आहेत. 

मोठी बातमी! काकोडा येथील महादेव मंदिरात सापडला 10व्या शतकातील 'कदंब'कालीन शिलालेख

दक्षिण गोव्यातील काकोडा येथील महादेव मंदिरात इसवी सनाच्या 10व्या शतकातील एक शिलालेख सापडला आहे. कन्नड आणि संस्कृत या दोन्ही भाषेत लिहिलेला हा शिलालेख कदंब काळातील असल्याचे इतिहास संशोधकांचे मत आहे.

उडपी जिल्ह्यातील मुल्की सुंदर रामा शेट्टी महाविद्यालयातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्र या विषयात तज्ञ असलेले सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक टी. मुरुगेशी यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे.

तसेच, गोव्यातील पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी या ऐतिहासिक शोधात सहकार्य केले.

सरत्या वर्षाचे सेलिब्रेशन ठरले अखेरचे, गोव्यात बेपत्ता झालेल्या मल्याळी तरुणाचा मृत्यू

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक गोव्यात हजेरी लावत असतात. यावर्षी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर गोव्यात बेपत्ता झालेल्या मल्याळी तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मूळचा वैकोम कुलशेखरमंगलम येथील रहिवासी असलेल्या संजय (19) याचा मृतदेह गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला.

मुंबई - गोवा महामार्गाच्या कामात चालढकल गांभीर्याने घेतली जाईल, तसेच तो न्यायालयाचा अवमान ठरेल - HC

मुंबई-गोवा महामार्ग बांधकामाबाबतच्या कालमर्यादेत कोणताही बदल अथवा चालढकल याची न्यायालयाकडून गांभीर दखल घेतली जाईल, तसेच तो न्यायालयाचा अवमान होईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (दि.04) स्पष्ट केले.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर मुंबई-गोवा महामार्गाबाबत दाखल जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी पार पडली.

महामार्गाचे काम आणि रुंदीकरणासाठी एनएचएआयकडून विलंब होत असल्याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आलीय.

हरमलमध्ये हॉटेल्स, रेस्ट हाऊसवर कारवाई

हरमल किनारी भागात प्रदूषण मंडळाचा ना हरकत दाखला नसल्यामुळे अनेक हॉटेल्स, रेस्ट हाऊस सिल करण्याची प्रक्रिया सुरू. पोलीस बंदोबस्त तैनात.

शिवोली पुलावर इनोव्हा कारगाडी आणि एप्रिलीया दुचाकीत अपघात

सुनावणी पुन्हा तहकूब..!

Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश असलेल्या 2017 मधील विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी म्हापसा न्यायालयाने सुनावणी येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.

कळसई येथे श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना निमंत्रण पत्रिका व कलश पुजन श्री सातेरी पिसानी देवीच्या चरणी ठेवून पुजन केले.आजपासुन सावर्डे मतदारसंघ व धारबांदोडा तालुक्यात अभियानाला प्रारंभ झाला आहे.

बोरीतील गल्लीबोळात बिबट्याचा खुलेआम वावर...

Leopard in Goa: बोरी गावातील गल्लीबोळात बिबट्याचा खुलेआम वावर दिसून येत आहे. यासंबंधी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

लोकसभेसाठी भाजप राबवणार विशेष यंत्रणा; चिंतन बैठकीत नियोजन

Goa BJP: लोकसभा निवडणूक तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम हे राज्यात दाखल झाले असून पुढील आठवड्यापासून लोकसभा मतदानासाठी प्रचाराव्यतिरिक्त कोणती यंत्रणा राबवायची, याचे नियोजन त्यांनी चिंतन बैठकीत केले. पक्षाच्या म्हापसा येथील कार्यालयात ही बैठक झाली. उद्या (शुक्रवारी) ते अल्पसंख्याक व अनुसूचित जाती मोर्चाची पणजीत बैठक घेणार आहेत.

इंधनाच्या दरात कोणताही बदल नाही! जाणून घ्या गोव्यातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती...

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com