Goa Updates 02 January 2024: गोव्यात दिवसभरात काय घडले? जाणून घ्या एका क्लिकवर

Goa Breaking News 02 January 2024: अरुण साखरदांडे बुधवारी भाजपमध्ये करणार प्रवेश
Goa Live Updates 02 January 2024 | Goa Breaking News
Goa Live Updates 02 January 2024 | Goa Breaking News Dainik Gomantak

अरुण साखरदांडेंचा बुधवारी भाजप प्रवेश!

कोंकणी अकादमीचे अध्यक्ष अरुण साखरदांडे हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी ते कोंकणी अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत.

रेल्वेत केरळच्या महिलेचा विनयभंग करणाऱ्यास मडगावात अटक; कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई

पूर्णा एक्‍सप्रेस या रेल्वेने केरळहून गोव्‍यात येणार्‍या एका केरळी महिलेला अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग करणाऱ्याला कोकण रेल्वे पोलिसांनी मडगावात अटक केली. दत्तात्रय चव्‍हाण ( वय 47) असे त्याचे नाव आहे. तो कन्नूर (केरळ) येथील आहे.

स्मार्ट सिटी कामामुळे अपघात प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करा; काँग्रेसची मागणी

स्मार्ट पणजी अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे युवकाचा जीव गेला. याला या कामाचा काँट्रॅक्टर जबाबदार आहे. काँट्रॅक्टरने पुरेशी काळजी घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. त्यांनी अशा काँट्रॅक्टरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दक्षिण युवक काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष महेश नाडर यांनी केली आहे.

अपघाती मृत्यूप्रकरणी गोवा मानवाधिकार आयोगाची स्मार्ट सिटी, PWD ला नोटीस

गोव्यात वर्षाच्या पहिल्याच दिवशी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामामुळे एका तरूणाचा जीव गेला. याची स्वेच्छा दखल गोवा मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. आयोगाने इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSSDL) चे एमडी तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता यांना 15 जानेवारीपर्यंत याबाबत अहवाल देण्याची नोटीस पाठवली आहे.

...म्हणून गोमन्तकीयांना दोन्ही पासपोर्ट ठेवण्याचे स्वातंत्र्य असावे - आलेमाव

Churchill Alemao: “मी पोर्तुगीजांना सलाम करतो. त्यांच्यामुळे गोव्याचा 80 टक्के विकास झाला होता. त्यांच्यामुळेच गोमन्तकीयांना परदेशात नोकरी करता येतेय. येथील लोक पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन कामाला जातात आणि मतदानासाठी भारतात परत येतात. त्यामुळे गोमन्तकीयांना दोन्ही पासपोर्ट ठेवण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. “

गोव्याचा 80 टक्के विकास पोर्तुगीजांमुळे - चर्चिल

Churchill Alemao: “मी पोर्तुगीजांना सलाम करतो. त्यांच्यामुळे गोव्याचा 80 टक्के विकास झाला. त्यांच्यामुळेच गोमन्तकीयांना परदेशात नोकरी करता येतेय. येथील लोक पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन कामाला जातात आणि मतदानासाठी भारतात परत येतात. त्यामुळे गोमन्तकीयांना दोन्ही पासपोर्ट ठेवण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. “

पर्यटनाचा लाभ! गोव्याच्या जीएसटीत 20 टक्क्यांनी वाढ, डिसेंबरमध्ये राज्याला मिळाले 553 कोटी

GST: गोव्याच्या जीएसटीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023 च्या डिसेंबरमध्ये गोव्याला 553 कोटी रुपये जीएसटीद्वारे मिळाले असून गेल्या वर्षीच्या जीएसटी महसुलाच्या तुलनेत हे प्रमाण 20 टक्के जास्त आहे.

पर्यटन क्षेत्रात (प्रामुख्याने लग्न सोहळे) झालेली वाढ, नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारच्या जीएसटीमध्ये 10 टक्के वाढ झाली.

गोवा विद्यापीठात जापनीज शिकण्याची संधी; दहा हजारांपेक्षा कमी फी

Goa University: गोवा विद्यापीठात जापनीज शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड एरिया स्टडीज अंतर्गत विद्यापीठाने ‘लर्न जपानीज’ हा अभ्यासक्रम पुन्हा सुरू केला आहे.

28 आठवडे 140 तासांत हा अभ्यासक्रम शिकवला जाईल, बारावी पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते. मूळ जपानी भाषकाद्वारे हा अभ्यासक्रम शिकवला जाईल, असे विद्यापीठाने म्हटले आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोवा बनावटीच्या मद्याची पुण्यात तस्करी, 1 कोटींचे मद्य जप्त

Goa Made Liquor Seized: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात एक कोटी रुपये किमतीचे गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 01 जानेवारी 2024 रोजी खेडशिवापूर जवळ ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये तब्बल 1000 हजार मद्याचे बॉक्स आढळून आले, पोलिसांच्या लक्षात येऊ नये यासाठी दुसऱ्या रंगातील बॉक्स समोरच्या बाजुला ठेवण्यात आले होते.

'गोवा गिलबाबा'ला श्रद्धांजली म्हणून मुंबईत रेव्ह पार्टी, थर्टी फर्स्टला दोघांना अटक, 95 जण ताब्यात

Crime News: यूएस संगीतकार, डीजे 'गोवा गिलबाबा' याला श्रद्धांजली म्हणून मुंबईत रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली. रविवारी (31 डिसेंबर) मुंबईतील घोडबंदर रोड येथे ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.

पोलिसांनी या पार्टीतून दोघांना अटक करण्यात आली असून, 95 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रघुनाथदादा पाटील पोहोचले ऊस उत्पादकांच्या उपोषणस्थळी

Sanjivani Sugar Factory: गोव्यातील ऊस उत्पादकांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणाला महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

गोवा समुद्रकिनारी भागांतील पब आणि रेस्टॉरंट्सवर आयकर खात्याचे छापे, सोमवारपासून सुरु आहे छापेमारी

भाजप सरकार विरोधकांना घाबरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध!

Yuri Alemao: आठव्या गोवा विधानसभेच्या सहाव्या अधिवेशनाच्या सहा कामकाजाच्या दिवसांची घोषणा करणारे गोवा विधानसभेच्या सचिवांनी जारी केलेल्या बुलेटिनने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या घोषणा अर्थहीन असतात आणि त्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मुख्यमंत्र्यांसाठी बीएसी म्हणजे बिजनेस ॲडवायजरी समिती नसून भाजप सल्लागार समिती असल्याचा टोला आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण करणार! ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

Sanjivani Sugar Factory: जोपर्यंत सरकार कारखाना सुरु करत नाही, तोपर्यंत गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे सर्व सदस्य साखळी उपोषण करणार. यावेळी आंदोलकांनी सरकारकडे संजीवनी सहकारी साखर कारखाना पूर्ववत करून गोव्यातील ऊस शेतीला प्राधान्य देण्याची मागणी केली.

आगशी-कुठ्ठाळी महामार्गावर 'हिट अँड रन'मध्ये  मारुती व्हॅन पलटी

Accident News: आगशी-कुठ्ठाळी राष्ट्रीय महामार्गावरील नवीन उड्डाण पुलावरून मडगावला जात असताना मारुती व्हॅनला एका चारचाकीने ठोकर मारून घटनास्थळावरून पळ काढला. ही धडक एवढी जोरदार होती की व्हॅन पुलावर पलटी झाली. सुदैवाने अनर्थ टळला. वेर्णा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

2 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात... 

Budget Session 2024: येत्या 2 फेब्रुवारीपासून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होणार आहे. सकाळी 11.30 वाजता अधिवेशन बोलावण्यात येणार आहे.

Budget Session 2024
Budget Session 2024Dainik Gomantak

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नायजेरियन नागरिकाला अटक

Goa Crime News: सोलोमन उगाचुक्वो (39) या नायजेरियन नागरिकाला गुन्हा शाखेने कोकेन बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 85 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई 

New Year Celebration: नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेकजण जल्लोषात येऊन मद्य पिऊन वाहन चालवतात. परिणामी अपघातांना आमंत्रण मिळते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात नेत्रावळीत वीजपुरवठा राहणार खंडित

Power Cut in Netravali: नेत्रावळीतील 11 केव्ही फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करायचे असल्याने बुधवार, 3 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नेत्रावळी आणि वाडे ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा केला जाणार नाही.

बाळ्ळी फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने गुरुवार, 4 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाळ्ळी मठ, जुजेगाळ, मालांगिणी, नयाबांद, देमानी, गोठण आणि मोरपिर्ला आणि फातर्पा ग्रामपंचायतीच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात किरकोळ घट; वाचा आजच्या पेट्रोल-डिझेलच्या ताज्या किमती

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 90.29

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com