Goa Budget 2024 Live News: दिवसभरातील सविस्तर घडामोडी वाचा एका क्लिकवर

Latest News on Goa and Goa Budget in Marathi (02 February 2024): पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या घडामोडी....
Latest News Of Goa and Goa Budget 2024 in Marathi | News on Goa Assembly Sessions, Pramod Sawant, Mapusa and much more
Latest News Of Goa and Goa Budget 2024 in Marathi | News on Goa Assembly Sessions, Pramod Sawant, Mapusa and much moreDainik Gomantak
Published on
Updated on

लोकसभेच्या महत्वपूर्ण चर्चेसाठी मुख्यमंत्री दिल्लीत!

लोकसभा निवडणुकीच्या महत्वाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल. यात लोकसभेच्या उमेदवारांच्या नावावरही होणार चर्चा. अमित शहा आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची घेणार भेट.

ऐन अधिवेशन काळात मुख्यमंत्री सावंत आणि राज्यपाल दिल्लीत

विधानसभा अधिवेशन सुरू असताना आणि मत्स महोत्सवाचे उद्घाटन असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यपालही दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण.

गावडे राजीनामा द्या : सरदेसाई

Vijai Sardesai: विधानसभा सभापतींचे आरोप गंभीर आहेत, त्यामुळे कारवाई अपरिहार्य आहे असे नमूद करून कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी केली.

सभापतींनी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने आता त्वरित चौकशी सुरू केली पाहिजे. मंत्र्याने पद सोडावे आणि चौकशीला सामोरे जावे अशी माझी मागणी आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

कोणत्याही चौकशीस तयार - गावडे

Govind Gaude: कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आपण कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचे प्रत्युत्तर सभापती रमेश तवडकर यांच्या आरोपांवर दिले आहे.

आपला कारभार पारदर्शक असून विधानसभा अविवेशनाचा मुहूर्त सभापतींकडून आरोप करण्यासाठी निवडला जाणे दुदैवी असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे.

आता मंत्री गावडेंवर सभापती तवडकरांचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप!

Goa Scam: कला अकादमीच्या कथीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन आधीच गंभीर आरोप झालेल्या मंत्री गोविंद गावडेंवर आता खुद्द सभापतींकडून भ्रष्टाचाराचे आरोप.

'काणकोणात सांस्कृतीक कार्यक्रम झाल्याचे भासवून लाख्खो रुपयांचा भ्रष्टाचार. प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा प्रकार पोचवणार' सभापती रमेश तवडकरांची माहिती.

राम मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या 'त्या' युवकाला विद्यालयातून काढून टाका!

लामगाव पाठोपाठ आता पिळगाव येथे राहणाऱ्या एका युवकाकडून सोशल मीडियावर अयोध्येतील श्रीराम मंदिरासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली. यासंदर्भात डिचोलीतील या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.रामभक्तांनी याबाबत संशयित असिफ करगडी याच्या श्री शांतादुर्ग उच्च माध्यमिक विद्यालय व्यवस्थापनाला निवेदन सादर केले आहे. सदर संशयिताला विद्यालयातून त्वरित काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

रणजी करंडक: सुयशचे मोसमातील तिसरे शतक

गोव्याच्या सुयश प्रभुदेसाई याने यावेळच्या रणजी करंडक क्रिकेट मोसमात तिसरे शतक झळकावले. पर्वरी येथे तमिळनाडूविरुद्ध पहिल्या डावात शतकी खेळी. यापूर्वी यंदा चंडीगडविरुद्ध पर्वरी येथे १९७,तर म्हैसूर येथे कर्नाटकविरुद्ध नाबाद १४३ धावा, एकंदरीत ३१व्या रणजी सामन्यात पाचवे शतक.

रिवण बाजारातील दुकानाच्या गोदामाला आग

रिवण बाजारातील नागेश प्रभुदेसाई यांच्या दुकानाच्या गोदामाला आग. जवळच असलेल्या शेतात लावलेल्या आगीच्या ठिणग्या वाऱ्यामुळे सर्वत्र पसरल्या, ज्यामुळे दुकानाच्या गोदामाला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती. कुडचडे अग्निशमन दलाने आग विझवली. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही.

पूनम पांडेने अलिकडेच दिली होती गोव्यातील कॅसिनोला भेट, पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेचे गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे निधन झाले आहे. 32 वर्षीय पांडेच्या अचानक निधनामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली. पूनम पांडे अलिकडेच गोव्यात आली होती. पूनमने एका कॅसिनोत गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. याचा व्हिडिओ पूनमने सोशल मिडियावर शेअर केला होता.

ड्रग्जतस्करी प्रकरणी दोघांंना अटक

हणजूण पोलिसांनी हडफडे येथे घातलेल्या धाडीत पाच लाखांहून अधिक किमतीचा ड्रग्ज जप्त. या कारवाईत दोन परप्रांतीय तरुणांना अटक.

श्री देव बोडगेश्र्वराला सोन्याचे कडे!

म्हापशातील श्री देव बोडगेश्र्वराला देवस्थान समितीकडून शनिवारी 3 फेब्रुवारीला दुपारी 12.30 वाजता हातातील सोन्याचे तसेच पायातील चांदीचे कडे अर्पण करण्यात येणार आहे.

Dev Bodgeshwar
Dev BodgeshwarDainik Gomantak

देशातील 'उत्कृष्ट समुद्रकिनारा' म्हणून मोरजी बीचला अवॉर्ड.. 

राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे

डबल इंजिन सरकारमुळे गोव्याचा प्रत्येक क्षेत्रात विकास

2019 च्या तुलनेत गोव्याचा GDP 33% आणि दरडोई उत्पन्नात 30% वाढ.

23 हजार लाभार्थ्यांनी पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतला असून 80% ट्रेडला लाभ मिळणार.

1 ते 10 वी पर्यंतच्या 2.3 लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी. दोष आढळून आलेल्या 3499 विद्यार्थ्यांना CSR अंतर्गत मोफत चष्मा आणि उपचार.

अग्निशमन दलाने 5527 कॉल अटेंड केल्याने 87 मानवी आणि 29 प्राण्यांचे जीव वाचले. तसेच 19 कोटींची मालमत्ता वाचवली

ग्रामीण भागातील 183 कुटुंबांना LPG योजनेचा लाभ

दीनदयाळ स्वास्थ्य आरोग्य योजना तसेच इतर आरोग्य योजनांतर्गत सरकार नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात यशस्वी... 

केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी गोवा अग्रेसर विश्वकर्मा योजनेंतर्गत श्रमजीवींना प्रशिक्षण देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पी. एस. श्रीधरन पिल्लई

डबल इंजिन सरकारमुळे गोवा प्रत्येक क्षेत्रात विकास करत आहे : राज्यपाल 

राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात...

आठव्या विधानसभेच्या सहाव्या अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे.

चिखली जंक्शनवर महिलेचे मंगूळसूत्र चोरण्याचा प्रयत्न, मात्र...

चिखली जंक्शनवर बससाठी थांबलेल्या महिलेल्या गळ्यातील मंगूळसूत्र खेचण्याचा प्रयत्न दोन अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र महिलेच्या सतर्कतेमुळे चोरीचा हा प्रयत्न फसला. चोर घटनास्थळावरून पसार. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दुसऱ्या दिवशीही सरपंच अमित सावंत यांचे आमरण उपोषण सुरूच

दुसऱ्या दिवशीही सरपंच अमित सावंत यांचे आमरण उपोषण सुरूच ,वाढता पाठिंबा ,प्रकरुतीवर परिणाम होण्याची भीती , पाणी अन्नाचा त्याग , सरकारने दखल घेवून मांद्रे पोलीस स्टेशनच्या पाटीवर नाव घालून ,सरपंच पदाचा मान ग्रह खात्याने राखावा , अशी पाठिंबा,सर्थकांची मागणी

मोबाईल फोन वाचवताना युवक पडला विहिरीत

फोंड्यात 22 वर्षांचा युवक गोविंद कश्यप हा विहिरी जवळ फोनवर बोलत बसला होता. बोलता बोलता अचानक त्याच्या हातून फोन निसटला फोन विहिरीत पडू नये यासाठी त्यांनी तत्परतेने फोन पकडण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नांमध्ये त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीमध्ये पडला.

आजपासून विधानसभेचे अधिवेशन

आजपासून गोवा विधानसभेचे अर्सनकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने अधिवेशन सत्राला सुरुवात होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com