Goa Daily News Wrap: इफ्फीचे वेध, तिसरा जिल्हा, गुन्हे अपडेट; राज्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

Goa Breaking News 16 November 2023: पणजी, मडगाव, म्हापसा तसे राज्यातील ब्रेकिंग बातम्या
Goa Live Updates | Goa Breaking News
Goa Live Updates | Goa Breaking NewsDainik Gomantak
Published on
Updated on

इफ्फीचे 99 टक्के कामे पूर्ण; CM प्रमोद सावंत

राज्यात 20 नोव्हेंबर पासून सुरू होत असलेल्या भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) 99 टक्के कामे पूर्ण झाले असून केवळ 'टच ऑफ' राहिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (गुरुवारी) दिली.

गोव्यात आता तिसरा जिल्हा? सरकारकडून अभ्यास समिती स्थापन

गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची मागणी सातत्याने होत आली आहे. सरकारने आता तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मिती प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

राजकीय नेते वासुदेव देशप्रभू यांना तुरुंगवासाची शिक्षा 

अल्पवयीन मुलाला मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी राजकीय नेते वासुदेश देशप्रभू यांना तुरुंगवासाची शिक्षा सुणावण्यात आली आहे. 2013 साली ही घटना घडली होती. दरम्यान, देशप्रभू यांना उच्च न्यायालयात 12 डिसेंबरपर्यंत अपील करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

Vilas Mahadik
Vilas Mahadik Dainik Gomantak

राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार 

राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त दैनिक 'गोमन्तक'चे ज्येष्ठ पत्रकार विलास महाडीक व नरेंद्र तारी यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केला गेला.

Narendra Tari
Narendra Tari Dainik Gomantak
MLA sankalp amonkar
MLA sankalp amonkar Dainik Gomantak

एमपीए-डेल्टा इन्फ्रालॉजिस्टिक्स करार स्पष्ट करा - आमदार संकल्प आमोणकर

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मुरगाव पोर्ट ऑथोरिटी आणि डेल्टा इन्फ्रालॉजिस्टिक्स यांच्यातील सामंजस्य करार स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

कुठल्याही संस्थेची मक्तेदारी ही व्यवसायासाठी बाधक ठरेल. त्यातून इतर अनेक कंपन्या बंद होतील. त्यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी उद्धभवू शकेल, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.यावेळी स्टीव्हडोअर असोलिएशनशी संबंधित तसेच इतर उपस्थित होते.

कळंगुटमध्ये 80 हजाराचा अमलीपदार्थ जप्त; मध्यप्रदेशमधील इसमाला अटक

कळंगुट परबवाडा येथे मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी एका परप्रांतीयांकडून 820 ग्रॅम वजनाचा 80 हजाराचा गांजा जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपेंद सिंग (रा. नायकवाडा मूळ रहिवासी मध्य प्रदेश) याला अटक केलीय.

कॅसिनोसाठी अर्ज करताना गुन्हा नोंद असल्यास परवाना नाही; नंतर गुन्हा दाखल झाल्यास परवाना होणार रद्द...

गोव्यात कॅसिनो चालविण्यासाठी परवाना मागणाऱ्या कॅसिनो चालकांना, अर्जदरांना गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

कॅसिनो ऑपरेटर आणि अशा अर्जदारांना किंवा कॅसिनोत प्रमुख व्यवस्थापकीय पदांवर असलेल्या कर्मचारी गुन्ह्यात दोषी आढळल्यास त्यांना किमान दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार आहे.

तिखाजन-मये येथील शखोल खाजन बांधाच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ

तिखाजन-मये येथील शखोल खाजन बांधाची दुरुस्ती करण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते करण्यात आला आहे. जलस्रोत खात्यातर्फे 3 कोटी खर्चून दुरुस्ती होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Mayem News
Mayem NewsDainik Gomantak

बेतोडा निरंकाल पंचायतीच्या सरपंचपदी मधू विष्णू खांडेपारकर

बेतोडा निरंकाल पंचायतीच्या सरपंचपदी मधु विष्णु खांडेपारकर यांची बिनविरोध निवड झालीय. उमेश गावडे यांनी राजीनामा दिला तेव्हापासून हे सरपंचपद रिक्त होते

शहरासह ग्रामीण भागात पसरतेय धुक्याची चादर; पहाटेच्या वातावरणात गारवा वाढला

अखेर राज्यात थंडीची चाहूल लागायला सुरुवात झालीयं. दिवाळी आधी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बराचसा बदल झाला होता. ऐन थंडीच्या हंगामात वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने देखील चिंता व्यक्त केली होती.

मात्र आज म्हणजेच 16 नोव्हेंबर पासून थोडीफार थंडी जाणवू लागली आहे. नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहुलही न लागल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु आता गोव्यातील ग्रामीण भागातही वातावरणात काहीसा गारठा जाणवू लागलाय.

तमनार पॉवर लाईन प्रकल्पाचे फक्त 20% काम शिल्लक- मुख्यमंत्री

गोव्यात अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी 2015 मध्ये उर्जा मंत्रालयाने गोव्यासाठी गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट सुरु केला असून या पॉवर लाईन प्रकल्पाचे आता फक्त 20% काम पूर्ण व्हायचे बाकी असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com