रविवारी दुपारी गिरी-सांगोल्डा जंक्शन येथे राष्ट्रीय महामार्गावर काम सुरु असताना 1000 एमएमची मुख्य जलवाहिनी फोडण्याचा प्रकार घडला. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, ते रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
बांबोळी येथे भाडेतत्वावर घेतलेल्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार विजेच्या खांबाला धडकून अपघात घडलाय. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर त्याच्या सोबतचे 3 प्रवासी प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
घाडीवाडा-कारापूर येथे दत्तप्रसाद नार्वेकर यांच्या राहत्या घराला आग लागल्याची घटना घडली असून या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.
कासवांच्या घरट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोरजी आणि मांद्रे किनारपट्टी आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय.
किनाऱ्यानजीकच्या हॉटेल्स, पबमध्ये रात्रौ 10 नंतर कानठळ्या बसवणारे संगीत आणि हुल्लडबाजीचे प्रकार सध्या मोरजी-मांद्रे भागात नियमितपणे घडत असल्याने स्थानिकांनी या विरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला आहे.
विशेष म्हणजे पोलिसांना या सर्व प्रकाराबद्दल कळवून देखील पोलिसांनी घटनास्थळी येऊन बघण्याची तसदीही घेतली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कोमुनिदाद जमिनीतील घरे कायदेशीर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विचाराला कोमुनिदाद संस्थांचा प्रखर विरोध, उलट कोमुनिदाद संस्थांच्या एटर्नींना बेकायदेशीर घरांवर कारवाईसाठी अधिकचे अधिकार देण्याची मागणी.
पणजी, दिव्यांग व्यक्तींची ओळख ही इतर कोणत्याही बाबीवर अवलंबून नसते तर ती त्यांच्या सामर्थ्यावर अवलंबून असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
म्हापसा कोर्टाने संशयित सूचनाला दिलेल्या या सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान सूचना अनेकदा ओक्साबोक्शी रडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला तिच्याकडून कोणतेची सहकार्य पोलिसांना मिळाले नाही.
मात्र नंतर ती फक्त पोलीस निरीक्षक परेश यांच्याशी बोलू लागली आणि हळूहळू गोष्टींचा उलघडा होऊ लागला. यावेळी अनेकदा तिने पोलिसांकडे मुलाचा फोटो दाखवण्याची मागणी केली. जेव्हा पोलीस तिला मोबाईलवर चिन्मयचा फोटो दाखवत तेव्हा-तेव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटे.
22 तारखेला अयोध्येत राम मंदीर प्रतिष्ठापना होत आहे. यादिवशी सर्वांनी आपल्या घरी, मंदीरात दिवाळी साजरी करावी. गोव्यात या दिवशी सगळ्यात मोठी दिवाळी सत्तरी आणि उसगावात साजरी होईल - विश्वजीत राणे, आरोग्य मंत्री
कोमुनिदादेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांना परवानगी नाकारली. ही बैठक फक्त कोमुनिदादच्या सदस्यांसाठीच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत गावकऱ्यांनी एनआयओ दोनापावला इथे निदर्शन केले. कोमुनिदादच्या संहितेशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्याची परवानगी न मिळाल्याने गावकरी नाराज
मागील काही दिवसांपासून डिचोलीत फिरत असलेला बिबट्या अखेर वन खात्याने लावलेल्या सापळ्यात अडकला. लोकांनी सोडला सुटकेचा श्वास.
राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढत चालले आहेत. ताळगाव कम्युनिटी सेंटरजवळील मोकळ्या जागेतून पार्क केलेली कार चोरल्याप्रकरणी रत्नागिरीतील एका 32 वर्षीय व्यक्तीला पणजी पोलिसांनी अटक केली.
राज सुहेद्रे असे आरोपीचे नाव असून तो मूळचा रत्नागिरी, सिंधुदुर्गचा आहे. तो सध्या ताळगाव येथे राहतो. त्याच्याकडून चोरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.
North Goa ₹ 97.37
Panjim ₹ 97.37
South Goa ₹ 97.56
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 89.97
Panjim ₹ 89.97
South Goa ₹ 89.68
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.