Today Goa News 28 Feb 2024: दिवसभरातील ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa Breaking News 24 February 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या घडामोडी...
Today Goa Live News 28 Feb 2024
Today Goa Live News 28 Feb 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

माहिती तंत्रज्ञान खात्याचे उपसंचालक सिध्दार्थ बोरकर निलंबीत!

खात्यात कंत्राटी पद्धतीवर नोकरीसाठी एका तरुणाकडे 1 लाखाची लाच मागणारे माहिती तंत्रज्ञान खात्याचे उपसंचालक सिद्धार्थ बोरकर यांचे अखेर निलंबन. निलंबीत लाचखोर अधिकाऱ्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता‌.

होंडा सत्तरीच्या औद्योगिक वसाहतीतील गादी गोदामाला आग; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत सुरु

होंडा सत्तरी येथील औद्योगिक वसाहतीत गादी करणाऱ्या कपड्याच्या गोदामाला शाॅट सर्किटमुळे आग लागुन लाखोंचे नुकसान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल संध्याकाळपासून आग विझविण्याचा प्रयत्न सुरूच...

मुरगाव मतदारसंघातील कोळसा प्रदूषण समस्या सोडवा

मुरगाव नगरपालिकेचे उपाध्यक्ष रामचंद्र कामत, दया नाईक कुणाली पार्सेकर, मंजुषा पिळणकर, लिओ रॉड्रिग्स, दामोदर कळसकर, प्रजय मयेकर आणि दामोदर नाईक यांनी एमपीए अध्यक्षांची भेट घेऊन मुरगाव मतदारसंघातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या कोळसा प्रदूषणाच्या समस्येवर चर्चा केली.

दुचाकी चोरल्याप्रकरणी परप्रांतियाला अटक; म्हापसा पोलिसांची कारवाई

म्हापसा येथील अलंकार थिएटरजवळून दुचाकी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी चमन उद्गट्टी (35, मूळ कर्नाटक) याला अटक केली. पोलिसांनी संशयिताकडून चोरीची गाडी हस्तगत केली.

होंडा इंडस्ट्रीमध्ये भाड्याच्या गाळ्याला आग

होंडा इंडस्ट्रीमध्ये एका भाड्याच्या गाळ्याला आग लागून मोठे नुकसान. वाळपई अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल.

पाणीपुरवठा मोर्चाची गोवा मावनाधिकार आयोगाने घेतली स्वेच्छा दखल

माजोर्डा, कालता, शापोरा, आसगाव, हणजूण या भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील रहिवाशांनी काढलेल्या मोर्चाची स्वेच्छा दखल गोवा मावनाधिकार आयोगाने घेतली आहे. आयोगाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांना नोटीस बजावून येत्या ११ मार्च २०२४ पर्यंत उत्तर देण्याचे व त्या दिवशी व्यक्तिशः उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

GMR कंपनीचा सरकारवर दबाव - माविन गुदिन्हो

मोपाला मी कधीच विरोध केला नव्हता. दाबोळी बंद होणार नाही असे मी आश्वासन देतो. पर्वरीचा उड्डाण पूल पुर्ण झाल्यावर मोपाला कोणीच जाणार नाही परत दोबोळीकडेच येणार. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने विरोधक कसलेही विषय घेऊन वाद करत आहेत. मी स्पष्टपणे सांगतो की GMR कंपनीचा सरकारवर दबाव आहे - माविन गुदिन्हो, वाहतूक मंत्री

बोडगेश्वर मंदिरात चोरी; दोघांना अटक

म्हापशातील जागृत देवस्थान असलेल्या श्री बोडगेश्वर मंदिरात चोरी प्रकरणात म्हापसा पोलिसांनी दोघा संशयितांना केली अटक. सागर शिंदे व आनंद नाईक (रा. म्हापसा व मूळचे कर्नाटक) अशी संशयितांची नावे. या मंदिराच्या प्रांगणात असलेली काचेची पादुका पेटी फोडून चोरांनी पैशांवर डल्ला मारला होता.

बोडगेश्वर मंदिरात चोरी; दोघे ताब्यात

म्हापशातील जागृत देवस्थान असलेल्या श्री बोडगेश्वर मंदिरात चोरी प्रकरणात म्हापसा पोलिसांनी दोघा संशयितांना घेतले ताब्यात. या मंदिराच्या प्रांगणात असलेली काचेची पादुका पेटी फोडून चोरांनी पैशांवर डल्ला मारला होता.

मुरगाव पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ! 

मुरगाव पालिकेच्या अर्थसंकल्प बैठकीत पालिकेतील कंत्राटी कामगारांना मिळणाऱ्या वेतनात वाढ करण्यात आली असून, येत्या जून महिन्यापासून त्यांना प्रतिदिन 1 हजार रुपये वेतन देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या त्यांचे वेतन प्रतिदिन 700 रुपये आहे.

म्हापशातील श्री बोडगेश्वर मंदिरात चोरी!

म्हापशातील जागृत देवस्थान असलेल्या श्री बोडगेश्वर मंदिरात आज बुधवारी पहाटे चोरी झाली. या मंदिराच्या प्रांगणात असलेल्या काचेच्या पेटीत पादुका असून भाविकांकडून यात पैसे अर्पण केले जातात. याच पैशांवर चोरांनी डल्ला मारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com