Today's Goa News 26 Feb 2024: दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa Breaking News 26 February 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज
Today's Goa News 26 Feb 2024
Today's Goa News 26 Feb 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

मार्रा-पिळर्ण येथील धिल्लन खून प्रकरणी मास्टरमाईंडला अटक

मार्रा-पिळर्ण येथील व्हिलाचे मालक निम्स धिल्लन (77) यांच्या खून प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. खूनाच्या तीन आठवड्यानंतर गोवा पोलिसांना या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात यश आले आहे. कुणाल खाटीक (24, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कुणालच संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

गोव्याच्या अधिकाऱ्यांना कळसा भांडुरा प्रकल्पाची पाहणी करण्यास कर्नाटकचा मज्जाव

कळसा भांडुरा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गोवा सरकार कधीही साइटला भेट देऊ शकते असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2009 मध्ये दिला होता. मात्र सरकारने हा आदेश प्रवाह बैठकीत दाखवला नसल्याची माहिती म्हादई बचाव अभियानाचे ॲडव्होकेट भवानीशंकर गडनीस यांनी दिलीय.

हणजूण-वागातोर परिसरातील 18 बेकायदेशीर बांधकामे सील

हणजूण-वागातोर परिसरातील 18 बेकायदेशीर बांधकामे सील. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत मंडळ, उत्तर गोवा बीडीओ आणि हणजूण पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलीय. आजपर्यंत, एकूण 43 बेकायदेशीर बांधकामे ओळखून सील करण्यात आली आहेत.

सूचना सेठच्या न्यायालयीन कोठडीत दहा दिवसांची वाढ

चार वर्षीय स्वतःच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित सूचना सेठ हिच्या न्यायालयीन कोठडीत आज बाल न्यायालयाने दहा दिवसांची वाढ केली. सिव्हिल सर्जन किंवा वैद्यकीय मंडळाकडून तिचे मानसिक मूल्यांकन व्हावे यासाठी तिचे वडील जॉय गोपाल सेठ यांनी दाखल केलेल्या अर्जावर बाल न्यायालयाने येत्या बुधवारपर्यंत (28 फेब्रुवारी) निर्णय राखून ठेवला आहे.

७७२ पोलिस कर्मचारी गोव्यातील विविध पोलिस खात्यात रुजू

पोलिस प्रशिक्षण घेऊन दीक्षांत सोहळा घेतलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक. ७७२ पोलिस कर्मचारी गोव्यातील विविध पोलिस खात्यात रुजू.

पर्वरीत बर्निंग कारचा थरार

पर्वरीत कदंब बस स्थानकाजवळ कारला आग. कारच्या इंजिनला आग लागल्याने कार जळून खाक. अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवले आगीवर नियंत्रण.

फरारी संशयित झेलिओ फर्नांडिस याला सशर्त अटकपूर्व जामीन

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व फसवणूक केल्याचा आरोप असलेला फातोर्डा येथील फरारी संशयित झेलिओ फर्नांडिस याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर.

टॅक्सी भाड्याने देण्याच्या नियमात सरकारने बदल करावाः चर्चिल

टॅक्सी भाड्याने देण्याच्या नियमात सरकारने बदल करावा. रेंट कॅबवरती कॅब मालकांकडून चालकांची नेमणूक केली जावी. तसेच, मांडवी अपघात प्रकरणात कठोर कारवाई करून टॅक्सी मालकांचा परवाना रद्द करावा. चर्चिल आलेमाव यांचे वक्तव्य

भाटले येथे रस्त्यालगत केलेल्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

भाटले येथे रस्त्यालगत केलेल्या पार्किंगमुळे मार्गावर वाहनांची रांग. वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय.

बायंगिणी - सांतान रस्ता एक वर्ष राहणार बंद!

संरक्षण भिंत कोसळल्याने बंद असणारा बायंगिणी - सांतान येथील रस्ता पुढील एक वर्ष देखील बंद राहण्याची शक्यता. प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी सरकारला सादर, निविदेनंतर पावसाळा वगळता 240 दिवसांत काम पूर्ण करण्याची मुदत. 28 जुलै 2023 पासून रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

'गुन्हे मागे घेऊ नका, दोषींवर कठोर कारवाई करा'; शिवप्रेमींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सां जुझे द आरियल येथे एका खासगी जागेत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद झाला. शिवजयंतीला शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करून परत जाताना समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर माती उधळून ढेकळांनी हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांत 20 जणांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी होत असताना, गुन्हे मागे न घेता दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमींनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे केलीय.

फरारी संशयित झेलिओ फर्नांडिसला जामीन मंजूर

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व फसवणूक केल्याचा आरोप असलेला फातोडी येथील फरारी संशयित झेलिओ फर्नांडिस याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला

अखेर वाळपई-रेडीघाट रस्त्याच्या कामाला सुरुवात!

वाळपई ते रेडीघाट रस्त्याचे गणपती मंदिरापर्यंत पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते भूमिपूजन. या कमासाठी एकूण 3 कोटी 30 लाख खर्च अपेक्षित.

सागवानची तस्करी; कडक कारवाई करा

साकोर्डा भागातून खैरीसह सागवान लाकूडची तस्करी होत असल्याने परिसरात सध्या खळबळ उडाली आहे. त्यात वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साकोर्डा वन खात्याच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची त्वरित बदली केल्याने तस्करी करणाऱ्या टोळीचे दाबे दणाणले आहे.

पाजीफोंडमध्ये जावेदवर दफनविधी

भरधाव ‘रेंट ए कर’च्या धडकेने मांडवी पुलावरून खाली पडून मृत झालेल्या जावेद सडेकरचा दफनविधी पाजीफोंड येथील दफनभूमीत २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com