Today's Goa News 25 Feb 2024: दिवसभरातील राज्यातील घडामोडींचा अंदाज घ्या एका क्लिकवर
उत्तर गोव्यातून भाजपतर्फे 'ही' चार नावे दिल्लीत !
भाजपच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक संपन्न. विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांसह, दयानंद सोपटे, माजी मंत्री दिलीप परुळेकरांसह दयानंद मांद्रेकरांच्या नावाचाही समावेश.
काँग्रेसचे लोकसभा उमेदवार मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता, 4 नावांवर होणार चर्चा!
मंगळवारी दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक. या बैठकीत गोव्यातील लोकसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब शक्य. सुत्रांच्या माहितीनुसार उत्तर गोव्यातून एड.रमाकांत खलप आणि विजय भीके तर दक्षिणेतून फ्रांसीस सार्दीन आणि कॅ.विरिएटो फर्नांडीस या 4 नावांपैकी 2 नावांची होणार अधिकृत घोषणा.
साखळी ते डिचोली मार्गावर मालवाहू रिक्षा उलटली
साखळी ते डिचोली मार्गावर सर्वण येथे मालवाहू रिक्षा उलटली. रिक्षात मागे बसलेले तीनजण जखमी. उपचारासाठी इस्पितळात दाखल
MRF शेड विरोधात पुन्हा रामतळे ग्रामस्थ एकवटले
MRF शेडला विरोध करण्याबाबत हळदोणा रामतळे ग्रामस्थांचा पुन्हा एल्गार. देव रामतलेश्वर मंदिराच्या महाजनांसोबत माजी आमदार ग्लेन टिक्लो तसेच माजी नगरसेवकांचा MRF शेडला विरोध. गावं तसेच इथला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन झालाच पाहिजे
हडफडे येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; नायजेरियन नागरिकाकडून 75 लाखांचा मुद्देमाल जप्त
हडफडे येथे अंमलीपदार्थविरोधी पथकाने छापा टाकून गुन्हेगारीची पार्शवभूमी असलेल्या नायजेरियाच्या ओकेझूयुनू आनेमेम (56वर्षे) याला अटक केली. त्याच्याकडून कोकेन, एक्स्टसी पावडर व चरस मिळून सुमारे 75 लाखांचा ड्रग्ज जप्त केला. 2013 मध्ये त्याला पर्वरी महामार्ग अडवल्या प्रकरणी अटक झाली होती.
राष्ट्रीय सीनियर फुटबॉल स्पर्धा: गोवा अव्वल स्थानी
संतोष करंडक ७७व्या राष्ट्रीय सीनियर फुटबॉल स्पर्धेत सेनादलास २-१ फरकाने नमवून गोवा अ गटात अव्वल. सलग दुसऱ्या विजयामुळे गोव्याचे ७ गुण, सेनादलाचे ६ गुण.
स्थानिक बसेस बंद झाल्यावर आम्हाला वाली कोण?
ताळगाव ग्रामपंचायतीची शेवटची ग्रामसभा आज (ता. 25) पार पडली. पणजी स्मार्ट सिटी झाल्यावर त्यांच्या स्थानिक बसेस बंद करण्यात येतील, असे बस मालकांना सांगण्यात आले आहे. मग आम्हाला वाली कोण? असा प्रश्न बसमालकांनी ग्रामसभेत उपस्थित केला.
नव्या महामार्ग आराखड्यासाठी भोमा पंचायतीचा ठराव! आयडीसीतील प्रदूषणावरही चर्चा
भोमा आडकोण ग्रामसभेत गावातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रस्थावित आराखडा रद्द करुन नव्याने करण्याबाबत ठराव संमत. यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी करणार पत्रव्यवहार. ग्रामसभेत पंचायत क्षेत्रातील कुंडई औद्योगीक वसाहतीतील प्रदूषणाचाही मुद्दा ग्रामस्थांकडून उपस्थित.
'नो पार्किंग'मध्ये वाहने लावणाऱ्यांवर होणार कारवाई!
मुख्य रस्त्यावर तसेच किनारी भागातल्या नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे मोरजी ग्रामसभेचे संकेत. रस्त्याशेजारी लावलेले हॉटेल्सचे बोर्ड काढण्यासाठी पंधरा दिवसांची दिली मुदत. जिल्हा पंचायत निधीतून होणाऱ्या विकास कामांवरही झाली चर्चा.
चिखलीमधील घरांचे होणार पुनर्मूल्यांकन!
चिखली ग्रामसभेने घरांच्या पुनर्मूल्यांकनावर भर दिला आहे. घराच्या पुनर्मूल्यांकनामुळे पंचायतीचा महसूल सुमारे 7 पट वाढेल, अशी माहिती सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी दिली.
अवेडे कोठंबी ग्रामसभेत Adinco Industries च्या कामाला ग्रामस्थांचा विरोध!
अवेडे कोठंबी ग्रामसभेत Adinco Industries च्या डिस्टिलरी कारखान्यासाठी खाजगी जागेत वीजवाहिनीसाठी केलेल्या खोदकामाला ग्रामस्थांचा विरोध. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता काम सुरू केल्याचा नागरिकांचा आरोप. अशा कोणत्याही खोदकामासाठी आपण परवानगी देणार नसल्याचे सरपंचांचे आश्वासन. योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून कचरा कर गोळा करण्याचाही निर्णय.
'या' पोलीस प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार भविष्यात बढती! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या 49व्या पोलीस शिपाई तुकडीचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. या तुकडीतील ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, तसेच मेकॅनिकल इंजिनियर प्रशिक्षणार्थ्यांना भविष्यात बढती दिली जाईल. या तुकडीतून 125 लेडीज पोलीस कॉन्स्टेबल, 174 पोलीस कॉन्स्टेबल आणि दिल्ली पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत असलेले 473 प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संचालन करून मानवंदना दिली.
'हर घर ग्रॅज्युएट'साठी गोवा सरकार प्रयत्नशील!
गोव्यातील प्रत्येक घरात भविष्यात ग्रॅज्युएटची डिग्री मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील. भविष्यात गोवा विद्यापीठातही बाह्य अभ्यासक्रम सुरू करणार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.