Goa Daily News Wrap: राजकारण, गुन्हे, पर्यटन, मनोरंजन विश्वातील गोव्यात घडलेल्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा

Goa Breaking News 13 February 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...
Today's Goa Live News 13 February 2024
Today's Goa Live News 13 February 2024Dainik Gomantak

गोव्यात येणाऱ्या ट्रकच्या टायरला आग

मोले भगवान महावीर अभयारण्याजवळ कर्नाटक येथून गोव्यात येणाऱ्या ट्रकच्या दोन्ही टायरने पेट घेतला. कुळे पोलिसांनी वन खात्याच्या टँकरच्या मदतीने आग नियंत्रणात आणली.

18 ते 19 फेब्रुवारी दरम्यान गोव्यात शिवजयंती कार्यक्रम

राज्यातील 6 मतदारसंघात 18 ते 19 फेब्रुवारी दरम्यान शिवजयंती साजरी केली जाईल. डिचोलीत मुख्य कार्यक्रम होईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

विविध राज्यांतील जागा लढविण्याबाबत निर्णय इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेतेच घेतील - पाटकर

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी लोकसभेच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवाराची घोषणा करण्यासाठी अचानक पत्रकार परिषद का घेतली हे एक कोडेच आहे. दक्षिण गोव्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व कॉंग्रेस पक्षाचे खासदार फ्रांसिस सार्दिन करीत आहेत हे त्यांनी लक्षात घेणे गरजेचे होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि विविध राज्यांतील जागा लढविण्याबाबत निर्णय इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

एल्टनची मुख्यमंत्र्यांच्या आनंदावर प्रतिक्रिया

'मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्याचा लोकसभा उमेदवार जाहीर केल्यानंतर आनंद व्यक्त होणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्र्यांना दक्षिण गोव्यातील काँग्रेस पक्षाची ताकद आणि भाजपची कमजोरी याची पूर्ण जाणीव आहे. भाजपची आशा फक्त मतविभागणीवर आहे. व्हिवा गोवा, व्हिवा इंडिया, व्हिवा रागा!' - एल्टन डिकॉस्ता, काँग्रेस आमदार.

गोव्यात इंडिया आघाडी विखुरली आहे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यात इंडिया आघाडी विखुरली आहे. आम आदमी पक्षाने गोव्यासाठी लोकसभा उमेदवाराची घोषणा केलीय. लोकांना राहुल गांधींवर विश्वास नाही, त्यांना आता केवळ नरेंद्र मोदींवर विश्वास आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

वाद टाळून समन्वयाने तंटा सोडवूया! 'प्रवाह'ची पहिली बैठक संपन्न

Mahadayi Water Dispute

म्हादई पाणी प्रश्नावरील प्रवाह अधिकारिणीची पहिली बैठक संपन्न. म्हादईचे पाणी काही प्रमाणात वळविण्यासाठी मान्यता देण्यात येतील. मात्र त्यासाठी डिपीआर तयार करावा लागेल. केंद्रीय यंत्रणांच्या मान्यतेनेच डिपीआरनुसार पुढील काम चालेल.

तिन्ही राज्यांचे प्रतिनिधी, व तज्ञांना घेऊन प्रवाहच्या उपसमित्या स्थापन करणार. पहिली बैठक गोव्यात झाल्याने पुढील बैठक महाराष्ट्र किंवा कर्नाटकात. 'प्रवाह'च्या पहिल्या बैठकीनंतर अधिकारिणीचे अध्यक्ष पी.एम.स्कॉट यांची पत्रकारांना माहिती.

आपचे धक्कातंत्र,काँग्रेसची अजून बोलणीच सुरू!

आम आदमी पक्षाने उत्तर गोव्यात आपला उमेदवार जाहीर केला असता तर आनंद झाला असता.दक्षिणेतले विद्यमान खासदार हे आमचेच आहेत. आमची केंद्रीय नेत्यांबरोबर चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाचा दोन्ही मतदारसंघांवर दावा कायम.

दक्षिण गोव्याचे लोकसभा उमेदवार म्हणून आमदार व्हेन्झी व्हिएगस यांच्या नावाची आपने घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकारांची प्रतिक्रिया.

कुट्टी फोंडा येथील वीज खात्याच्या कर्माचाऱ्यांतर्फे आयोजित गणेश जयंती उत्सवाला उदंड प्रतिसाद. हजारो भाविकांनी घेतले दर्शन. मुख्य रस्त्यावर वाहतूक खोळंबली. विविध धार्मिक उपक्रमांसहित महाप्रसादाचे आयोजन. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.

बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आर्थिक व्यवहार; चौघांना अटक

बनावट पॅनकार्ड आणि आधार कार्डच्या सहाय्याने डिचोलीतील व्यक्तीच्या नावे म्हापशातील एका बँकेतून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी चार जणांना अटक केली. रझाक बेलवडी (26), गौतम कोरगावकर (38), देवानंद कवळेकर (43) व राहुल पाडलोस्कर (38) अशी संशयितांची नावे आहेत.

व्हेंझी व्हिएगस आप'चेच नव्हे तर इंडिया आघाडीचे उमेदवार!

आम आदमी पक्षातील दक्षिण गोव्याचे उमेदवार व्हेंझी व्हिएगस हे केवळ 'आप'चेच नाहीत; तर इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आम्ही बराच वेळ वाट पाहिली, पण लोकसभा निवडणुका जवळ आल्याने वेळ निघून जात होती.

इंडिया आघाडीच्या दृष्टीने पुढे वाटचाल करत आम्ही हा निर्णय घेतला असून आम्हाला आशा आहे की काँग्रेस तो स्वीकारेल. आप प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांचे वक्तव्य

आल्तिनमध्ये चारचाकीचा अपघात

आल्तिनच्या उतरणीवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका चारचाकीचा अपघात. अपघातात एक युवती किरकोळ जखमी.

आम आदमी पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवार जाहीर!

आम आदमी पक्षाकडून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर. बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्या नावाची घोषणा.

बेतोडा येथील सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती उत्साहात संपन्न. सकाळ पासून अभिषेकादी धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांची गर्दी. दुपारी बाल गणेशाची चांदीची मूर्ती पाळण्यात घालून पाळणा गीत गाण्यात आले. दुपारी तीर्थप्रसाद, महाप्रसाद व संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम झाला.

काणकोणात ब्रिटन नागरिक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ!

क्रिस्टोफर विल्यम्स नावाचा 71 वर्षांचा ब्रिटन नागरिक काणकोण येथे एका खोलीत मृतावस्थेत आढळल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूचे कारण अजून समोर आले नसून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

कुडचडेतील संजय सेंटरची पायाभरणी

कुडचडेतील विशेष शिक्षणासाठी असलेल्या संजय सेंटरच्या पायाभूत सुविधांच्या कामाची पायाभरणी डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. यावेळी आमदार नीलेश काब्राल, संजय सेंटरचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर, केदार नाईक, सिद्धार्थ देसाई तसेच इतर मान्यवर उपस्ठित होते.

मडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बबिता नाईक

मडगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बबिता नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

बबिता नाईक
बबिता नाईकDainik Gomantak

महेंद्रसिंग धोनीचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत...

धारबांदोडा येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रास्तारोको

सोमवारी रात्री धारबांदोडा येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रास्तारोको करण्यासाठी जमलेल्या स्थानिकांशी चर्चा करताना फोंड्याचे पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर. सोबत सरपंच विनायक उर्फ बालाजी गावस व इतर. या अपघातात सांगे येथील एका युवतीला आपला जीव गमवावा लागला.

Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

सरकारचा पेडणे संपवण्याचा डाव हाणून पाडावा: अॅड. अमित सावंत

मांद्रेचे सरपंच अॅड. अमित सावंत पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये असून सरकारच्या कामावर निशाणा साधला आहे. गोवा विधानसभेत जमीन झोनिंग प्लॅन, जमीन रूपांतर कायदा कलम 16 (बी) साठी पर्याय म्हणून जे कलम न्यायप्रविष्ट आहे न्यायालयात याबाबत अजून निकाल दिलेला नाही आणि हे कलम बदलण्यासाठी त्याला पर्यायी म्हणून 39 (ए) हे कलम समाविष्ट केले आहे.

धक्कादायक! मोर्ले सत्तरीत 5 वर्षांच्या मुलीच्या खूनाचा प्रयत्न

मोर्ले सत्तरीत पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्यावर दगड मारून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यामध्ये मुलगी गंभीररित्या जखमी. मोर्ले चिरेखणी भागात राहणाऱ्या मजुरांच्या वस्तीमधील घटना. कालपासून (ता. 12) मुलगी होती बेपत्ता.

परवानगीशिवाय चित्रीकरण केल्यास 50,000 रुपये दंड!

आवश्यक परवानग्या न घेता आणि शुल्क न भरता राज्य सरकारच्या मालकीच्या कोणत्याही संरक्षित स्मारकावर किंवा जागेवर चित्रपट करणाऱ्यांना गोवा सरकारने 50,000 रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच इतर संरक्षित स्मारकांवर चित्रीकरण केल्यास 20,000 रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com