गोव्यात वाढती मुस्लीम लोकसंख्या भाजपसाठी मारक, हिंदू जनजागृती समिती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today Breaking News In Marathi: गोव्यात विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडी.
Goa Today's News Live Update: गोव्यात वाढती मुस्लीम लोकसंख्या भाजपसाठी मारक!
Hindu Janjagruti SamitiDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात वाढती मुस्लीम लोकसंख्या भाजपसाठी मारक!

2022च्या निवडणूकीवेळी गोव्यात मुस्लीम मतदारांची संख्या 85 हजार (साडे सात टक्के) होती. 2027 मध्ये ती 10 ते 12 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. गोव्यात मुस्लीमांचे लोंढ्याचे लोंढे येत आहेत. त्यांची इथे वोटबँक तयार होऊ देऊ नका. त्याचा फटका भाजपला बसेल. याबाबतची कल्पना मी भाजप नेत्यांना दिलीय. विभाग संघचालक राजेंद्र भोबेंचे वक्तव्य.

स्वातंत्र्य दिनानिमित्त गोवा भाजपच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या ऐतिहासिक दिनानिमित्त युवकांना सहभागी करून घेण्यासाठी गोवा भाजप 11, 12 आणि 13 ऑगस्ट रोजी सर्व मतदारसंघात बाईक रॅली काढणार आहे. तसेच, मतदारसंघातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची स्वच्छता केली जाईल.

14 ऑगस्ट हा फाळणी दिवस, स्मरण दिन म्हणून दोन्ही जिल्ह्यात मूकमोर्चा, प्रदर्शन करत साजरा केला जाणार आहे.

सरदेसाई यांच्या संडे डायलॉग कार्यक्रमामागे राजकारण - मोरेनो रिबेलो

गोव्यातील सर्व ४० मतदारसंघात काँग्रेसची संघटना व अस्तित्व आहे. आमचे अध्यक्ष अमित पाटकर यांना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी कुडचडे येथील "संडे डायलॉग"ची कल्पना दिलेली नाही. सदर कार्यक्रम हा त्यांचा वैयक्तिक लोकसंपर्काचा भाग आहे असा माझा समज होता. परंतू, गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी दुर्गादास कामत यांचे आजचे वक्तव्य त्यामागे राजकारण असल्याचे दर्शवते. - मोरेनो रिबेलो, काँग्रेस सरचिटणीस.

12 मतदारसंघ भंडारी समाजासाठी राखीव ठेवा; सुदीप ताम्हणकर

बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांच्याकडून भंडारी समाजासाठी आरक्षणाची मागणी. आरक्षण मिळवण्यासाठी संघटनेने पुढे येण्याचे आवाहन. 12 मतदारसंघात भंडारी समाजासाठी आरक्षण देण्याची ताम्हणकर यांची पत्रकार परिषदेत मागणी.

प्रसिद्ध देव दामोदर भजनी सप्ताहाला वास्कोत प्रारंभ!

वास्कोतील जागृत दैवत देव दामोदराच्या प्रसिद्ध भजनी सप्ताहाला शनिवारपासून प्रारंभ. यंदा सप्ताहाचे १२५ वे वर्ष आहे.

डिचोलीत सिग्नल यंत्रणा बंद, अपघातांचा धोका

डिचोली शहरातील 'सिग्नल यंत्रणा' पंधराहून अधिक दिवसांपासून नादुरुस्त. छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ वाहतुकीचे तीन तेरा. अपघातांचा धोका.

गांजे-उसगावात तीन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद

गांजे-उसगावात गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सोमवारपर्यंतचा अल्टिमेट्म. अन्यथा नव्या 25 एमएलडी पाणी प्रकल्पाचे काम बंद करण्याचा ग्रामस्थांचा इशारा.

सराईत चोरटा गौरीश केरकरला अटक

सराईत चोरटा गौरीश केरकर याला पर्वरी पोलिसांकडून अटक. फरार गौरीश शुक्रवारी (०९ ऑगस्ट) तोरडा खाडीजवळून पळून जाण्याच्या तयारीत असताना कारवाई. पणजीतील चोरीप्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत होते. यापूर्वी त्याच्या विरोधात चोरी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल आहेत.

आपकडून सनबर्न आयोजकांविरोधात पोलिस तक्रार

आम आदमी पक्ष गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांच्यासह आप नेत्यांकडून सनबर्न आयोजकांविरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार. सरकारकडून आवश्यक परवानगी न घेता तिकीट विक्री सुरु असल्याचा आपचा आरोप.

अहंकार दुखावलेल्या भाई नायक यांनाच पुतळ्याची समस्या; विनायक वळवईकर

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासंबधित कोणताही वाद नाहिए. उद्घाटनाला न बोलवल्याने भाई नायक यांचा अहंकार दुखावला गेला, त्यामुळे केवळ त्यांनाच याबाबत समस्या आहे. धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नये. शिवप्रेमी विनायक वळवईकर यांचा इशारा.

विजय यांचा आता 'रविवार संवाद' कार्यक्रम

चतुर्थीनंतर पुन्हा जनता दरबार घेण्याची घोषणा केलेल्या विजय सरदेसाईंचा आता 'रविवार संवाद' कार्यक्रम. कुडचडेत रविवारी (११ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता होणार कार्यक्रम. राज्यातील चाळीस मतदारसंघात प्रत्येक रविवारी होणार संवाद.

Goa Crime News: गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून विनायक मलाप्पा जाधव (रा. बोर्डा) याला अटक. संशयित जाधवकडून 31,400 किंमतीचा 314 ग्रॅम गांजा जप्त. पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com