Goa Today's Update: दिवसभरातील ठळक घडामोडींचा आढावा घ्या एक क्लिकवर

Goa Today's Live Update 07 March 2024: राज्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा आणि विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा.
Goa Today's Live Update 07 March 2024
Goa Today's Live Update 07 March 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील एसटींसाठी खूश खबर, राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश!

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत गोव्यातील एसटींसाठी राजकीय आरक्षण देण्याबाबत नवा कायदा संमत करणार. ह्या नव्या कायद्याव्दारे राज्यात एसटी समाजासाठी मतदारसंघ होणार राखीव. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची दिल्लीत पत्रकार परिषदेत माहिती‌

गोवा सात वर्षांनंतर अंतिम फेरीत

गोव्याने संतोष करंडक राष्ट्रीय सीनियर पुरुष फुटबॉल स्पर्धेत सात वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली. नेसियो फर्नांडिस याने इंज्युरी टाईम व अतिरिक्त वेळेत केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे पिछाडीवरून गोव्याने उपांत्य लढतीत मणिपूरला २-१ फरकाने नमविले. अंतिम सामन्यात गोवा सेनादलाविरुद्ध खेळेल.

आमोणकरांनी मांडलेले विविध प्रकल्प लवकरच सुरु करणार - खंवटें

विकसीत भारत संकल्प यात्रेत पर्यटन मंत्री रोहन खंवटेंनी आमदार संकल्प आमोणकर यांना दिलंय आश्वासन. बायणा बीच सुशोभिकरण ड्रीम प्रोजेक्ट, बहुप्रतिक्षित व्ह्यूइंग गॅलरी प्रकल्पासोबतच सडा येथील लक्ष्मी नारायण मंदिराचे सुशोभीकरण आणि आमोणकरांनी मांडलेले विविध प्रकल्प लवकरच सुरु करणार

थिवी रेल्वे स्थानक परिसरात टॅक्सी व्यवसायाला कायदेशीर परवानगी द्या

थिवी रेल्वे स्थानक परिसरात टॅक्सी व्यवसायाला कायदेशीर परवानगी द्या, या मागणीसाठी शिरसाई पर्यटक टॅक्सी संघटनेचे टॅक्सी मालक एकवटले. मागील अनेक वर्षापासून येथे विनापरवाना टॅक्सी व्यवसाय केला जात असल्याचे मत.

परवाना धारक टॅक्सीची कमतरता आणि वाढलेली रेल्वे संख्या पाहता तातडीने परवानगी देण्याची मागणी.

Taxi Owners | Thivim Railway Station
Taxi Owners | Thivim Railway StationDainik Gomantak

विवाह नोंदणीसाठी बनावट रहिवासी दाखले, जिल्हा निबंधकांची फातोर्डा पोलिसात तक्रार

विवाह नोंदणीसाठी वापरण्यात आलेल्या बनावट रहिवासी दाखल्याबाबत जिल्हा निबंधकांची फातोर्डा पोलिसात तक्रार. संशयास्पद कागदपत्रांच्या तपासणीत जोडलेले दाखले मामलेदार कार्यालयाने दिले नसल्याचे उघड.

समान अनुक्रमांकांचे 4 दाखले सापडले, यातील एका दाखल्यावर यापूर्वी बदली झालेल्या मामलेदाराची स्वाक्षरी होती. चौकशीअंती प्रमाणपत्रासाठी दलालास मोठी रक्कम दिल्याचे समोर.

07 एप्रिल नंतर स्पीड गव्हर्नर नसल्यास कारवाई; माविन गुदिन्हो

सरकार स्पीड गव्हर्नरबाबत गंभीर आहे. सर्व प्रकारच्या टॅक्सी आणि रेंट अ कॅब वाहनांना स्पीड गव्हर्नर अनिवार्य आहेत.

07 एप्रिल नंतर ज्या गाड्यांना स्पीड गव्हर्नर नसतील त्यांचावर कडक कारवाई केली जाईल. टॅक्सी चालकांना कुठल्याही ठिकाणांवरून स्पीड गव्हर्नर खरेदी करण्याची मुभा आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak

रस्ते अपघातात बळी गेलेल्या कुटूंबांना वाहतूक खात्यातर्फे प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत.

रस्ते अपघातात बळी गेलेल्या कुटूंबांना वाहतूक खात्यातर्फे प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख आहे ते या योजनेचे लाभार्थी असून आता हे उत्पन्न 10 लाख करण्यात आले.

पुर्वी या योजनेच्या नावनोंदणी करीता असलेली 180 दिवसांची असलेली मुदत वाढवून 365 दिवस करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

सात विरुद्ध शून्य ; सरपंच दत्तप्रसाद यांची उचलबांगडी

कारापूर-सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांची उचलबांगडी. अविश्वास ठराव 7 विरुद्ध शून्य मतांनी संमत. गुरुवारी चर्चेसाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीस सरपंच, उपसरपंचांसह चार पंचसदस्य अनुपस्थित.

अपघातातील मृताच्या कुटुंबियांना मिळणार 10 लाख रुपये

रस्ते अपघातात जीव गमावलेल्या 33 पैकी 16 मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आलीय. यापुढे ही रक्कम 10 लाख केली असून ती ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात जमा होईल. रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती.

विकासकामात देशात दहावा क्रमांक - श्रीपाद नाईक

विकासकामांच्या बाबतीत मी देशात दहाव्या क्रमांकावर आहे. प्रसार माध्यमांनी देखील याची दखल घेतलीय. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे पण, आरोप करताना तथ्य तापासून घ्यावीत, असे राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

Goa Loksabha Election 2024 | Shripad Naik
Goa Loksabha Election 2024 | Shripad NaikDainik Gomantak

फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शनासाठी 17 कोटी रुपयांची कामे

ओल्ड गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शनासाठी बॉम जिझस येथील सुविधा निर्माण करण्यासाठी 17 कोटी रुपये कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषण केलीय. येत्या 21 नोव्हेंबरपर्यंत ही कामे पूर्ण होतील अशी माहिती सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन 21 नोव्हेंबर 2024 ते 05 जानेवारी 2025 या काळात आयोजित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com