Goa News Update 20 December 2023: वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

नेत्रावळीतील झामगाळी पुलावर अपघातात कुमारी सांगे येथील एक ठार
Goa Live News Update 20 December 2023
Goa Live News Update 20 December 2023Dainik Gomantak

नेत्रावळीतील झामगाळी पुलावर अपघातात कुमारी सांगे येथील एक ठार

नेत्रावळी येथील झामगाळी पुलावर झालेल्या अपघातात कुमारी सांगे येथील रामदास वेळीप यांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ते नेत्रावळी येथील त्यांच्या नातेवाईकांकडे चालले असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. त्यांची दुचाकी रस्त्यावर पडली होती आणि मृतदेह पाण्यात आढळून आला.

म्हापशातील सराफ दुकानातून 25 ग्रॅमचे सोन्याचे कडे चोरणाऱ्यास अटक

म्हापसा येथील नागवेकर ज्वेलर्स या दुकानातून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे चोरणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. निलेश विनायक नाईक असे त्याचे नाव आहे. चोरी करताना त्याच्यासमवेत त्याची पत्नीही होती. तिलाही पोलिसात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.

वजन माप खात्याची धाड; 8 लाखाचे इलेक्ट्रिकल साहित्य जप्त

गोव्यातील वजन आणि माप खात्याने बुधवारी आरळे फार्तोर्डा रॉयल इलेक्ट्रिकल अँड जनरल सेल्स अँड सर्व्हिस, केईआय वायर्स अँड केबल्स या दुकानावर छापा टाकला. नियम भंग केल्याप्रकरणी येथून सुमारे 8 ते 10 लाख रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सत्तरी तालुक्यात 20 हेक्टर जमीन भाजी लागवडीखाली येणार

सत्तरीत तालुक्यात एकुण 20 हेक्टर जमीन यंदा भाजी पाला लागवडीखाली येणार आहे. अशी माहीती कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, यंदा पाऊस लांबला. त्यामुळे भाजी लागवडीला उशीर झाला. मात्र आता हे वातावरण भाजी लागवडीसाठी उपयुक्त आहे. एकुण 50 किलो बियाणे कृषी खात्यातर्फे विक्री झाले आहे. तसेच हे बियाणी 50 टक्के सवलतीत विकले गेले आहे.

गोव्यात आता 'फ्लू क्लिनीक'! आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती

देशभरात पुन्हा कोव्हिडच्या नव्या व्हेरियंट्सचे रूग्ण सापडू लागले आहेत. त्या पार्श्वभुमीवर बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी देशभरातील सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्गवारे ही चर्चा झाली.

यात गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे देखील सहभागी झाले. या बैठकीनंतर गोव्यात जिल्हा रुग्णालयांमध्ये फ्लू क्लिनीक सुरू करणार असल्याची माहिती विश्वजीत राणे यांनी दिली.

सगळं मान्य! सर्व परवाने घेऊ, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी काळजी घेऊ; सनबर्नची न्यायालयाला ग्वाही

ध्वनी संबधित सर्व परवाने घेऊ, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्व काळजी घेतली जाईल, महोत्सव सभोवतालच्या परिसरात ध्वनी रोधक मेचेरिअल बसवले जाईल आणि ध्वनी मर्यादेचे पालन केले जाईल अशी ग्वाही सनबर्न आयोजकांनी उच्च न्यायालयाला दिले आहे.

डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या ‘वर्सल’ कथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार

डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या ‘वर्सल’ कथा संग्रहासाठी केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

सनबर्न ध्वनी प्रदूषणासंदर्भात कृती आराखडा गुरुवारी 4 वाजेपर्यंत सादर करा; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

वागातोर येथील सनबर्न ध्वनी प्रदूषणासंदर्भातचा कृती आराखडा उद्या गुरुवारी ४ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश सरकारला उच्च न्यायालयाने आज दिले.

दरम्यान या धनीप्रदूषणामुळे त्या परिसरात राहणाऱ्या काही मुलाना ऑटिजमचा आजार असल्याने त्यासंदर्भात हस्तक्षेप अर्ज सादर झाला आहे त्यावरील सुनावणी उद्या ठेवली आहे. याचिकादार डेसमंड मेंडीस यालाही सूचना सुनावणीपूर्वी मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

भोम हायवे रुंदीकरण; भोमवासियांची पोलिसांकडून धरपकड!

भोम हायवे रुंदीकरणासाठी झाडांच्या सिमांकन प्रक्रियेला विरोध करणाऱ्या भोमवासियांची पोलिसांकडून धरपकड. शेकडो ग्रामस्थांना पोलिसांनी घेतले ताब्यात. वातावरण तंग

नवीन वर्षाच्या तोंडावर गोमन्तकीयांना वीज दरवाढीचा शॉक

गोमन्तकीयांना नववर्षाची भेट म्हणून राज्य सरकारने विज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती ग्राहकांच्या विज वापर दरात 10 ते 70 पैसे दरवाढ नियोजित आहे.

थेट पोलीस उपअधीक्षक नोकरभरती प्रक्रिया रद्द

पोलीस खात्यातील थेट पोलीस उपअधीक्षक नोकरभरती प्रक्रिया सरकारने मागे घेऊन गोवा लोकसेवा आयोगाला ही प्रक्रिया पुढे सुरु न ठेवण्याचे कळविले आहे अशी माहिती अ‍ॅडव्होकेट जनरलांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दिली त्यामुळे काही पोलीस निरीक्षकांनी या नोकरभरती नियमांना व जाहिरातीला आव्हान दिलेली याचिका खंडपीठाकडून निकालात.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा नवे पोर्तुगीज - मनोज परब

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे नव्या काळातील पोर्तुगीज आहेत, त्यांच्यापासून आपल्याला भीती बाळगण्याची गरज आहे, असे आरजीचे मनोज परब यांनी वक्तव्य केले आहे.

चर्चिल आलेमाव म्हणतात मी पोर्तुगीजांना सलाम करतो

माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी 'मी पोर्तुगीजांना सलाम करतो', असे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. गोवा मुक्तिदिनीच आलेमाव यांनी केलेल्या या वक्तव्याने नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.

कुडतरीतील राय तळ्यात कमळे काढण्यासाठी उतरलेल्या एकाचा बुडून मृत्यू

कुडतरीतील राय तळ्यात कमळे काढण्यासाठी उतरलेल्या एकाचा बुडून मृत्यू. शंकर वडार (38) असे या मृत नागरिकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना उघडकीस आली. तळ्यातील कमळे काढून तो बेळगाव येथे त्याची विक्री करत असे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com