Goa News Update 17 December: गोव्यातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या...

पाजीफोंड येथे हिंदू स्मशानभूमीजवळ पंच सदस्याला मारहाणप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल
Goa Live News Update 17 December 2023
Goa Live News Update 17 December 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

पाजीफोंड येथे हिंदू स्मशानभूमीजवळ पंच सदस्याला मारहाणप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

पाजीफोंड मडगाव येथील स्मशानाजवळ पंच सदस्य साईश राजाध्यक्ष आणि आणखी एकावर हल्ला झाला होता. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी 7 जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अफजल शेख, जाफर खान, मंजुनाथ हरिजन, शाबुद्दिन काडोल, नासिर शेखर, निजाम बसू, जाफर बसू अशी संशयितांची नावे आहेत.

गोव्याच्या महिलांचा मेघालयवर ९ विकेट राखून विजय 

गोव्याच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने टी-२० स्पर्धेत कमकुवत मेघालयावर नऊ विकेट राखून सोपा विजय प्राप्त केला. त्यांनी ३७ धावांचे लक्ष्य ४.५ षटकांतच पार केले.

चेतन साळगावकरला टेबल टेनिसमध्ये ब्राँझ; गोव्याला एकूण 4 पदके

गोव्याचा टेबल टेनिसपटू चेतन साळगावकर याने पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या गट नऊमध्ये ब्राँझपदक पटकावले. राज्याला या स्पर्धेत मिळालेले हे चौथे पदक ठरले. राजधानी दिल्लीत ही स्पर्धा सुरू आहे.

टी-२० क्रिकेट स्पर्धेत वास्को वॉरियर्सला विजेतेपद

गोवा व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनच्या अखिल गोवा व्हेटरन्स टी-२० क्रिकेट स्पर्धेत वास्को वॉरियर्सने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पाटणेकर वॉरियर्सवर नऊ धावांनी मात केली.

पशु आरोग्य सेवेत मोठं पाऊल; 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध होणार

राज्यातील पशुपालकांसाठी महत्वाची बातमी हाती येतेय. जखमी तसेच आजारी असलेल्या पशूंच्या वैद्यकीय सेवेसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री पशु सेवा योजनेंतर्गत 24 तास सेवा देणारी पशु रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेत यामध्ये फिरती रुग्णालये तसेच दुचाकी रुग्णवाहिकांचा समावेश केला आहे. सदरच्या सेवेसाठी पशुपालकांना 200 ते 500 पर्यत सेवाशुल्क मोजावे लागणार असून भटक्या जनावरांसाठी ही सेवा मोफत पुरवली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पारोडा पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमीचा वाद उफाळला

काही दिवसांपूर्वी पेडणे येथील स्मशानभूमीत पाणी, विजेची समस्या निर्माण झाल्याने वाद उफाळून आला होता. असेच काहीसे प्रकरण दक्षिण गोव्यातील तळ्यावाडी गुढी पारोडा परिसरातील स्मशानभूमीबाबत घडले आहे.

येथील गावकऱ्यांनी त्यांच्या स्मशानभूमीला कुंपण घालण्यासाठी सर्व्हे करून सिमेंटचे पोल पुरले होते परंतु काही दिवसांनी अज्ञात व्यक्तीने ते सर्व पोल काढून टाकले होते.

'या' कारणास्तव केंद्राने दिलेय राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे निर्देश

कुवेतचे अमीर शेख नवाफ अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्या निधनामुळे आज राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकावण्याचे केंद्राचे गोव्यासह सर्व राज्यांना निर्देश. मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित न करण्याच्याही सूचना.

केपे येथे हिट अँड रनचे प्रकरण; पोलीस घटनास्थळी दाखल

राज्यातील अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढतच असून काल शनिवारी सकाळच्या सत्रात शापोरा येथे हिट अँड रनचे प्रकरण घडले होते. तसेच प्रकरण केपे येथील दत्त मंदिरजवळ घडले असून दोन दुचाकींमध्ये अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

यात एका दुचाकीने अॅक्टिव्हाला धडक दिली असून धडक दिल्यानंतर सदर दुचाकीस्वाराने पलायन केलंय. मात्र धावताना त्याचा मोबाईल जागीच पडला असून धडक दिलेल्या दाम्पत्याला किरकोळ दुखापत झालीय.

माजोर्डा रेल्वे गेट येथे रेल्वेची धडक बसून महिलेचा मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरु

माजोर्डा रेल्वे गेट येथे रेल्वेची धडक बसून एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची बातमी हाती येतेय. हा अपघात नक्की कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com