Goa News News: मंत्री गावडेंच्या विरोधात सरकारातून षडयंत्र, 'उटा'गावडेंच्या पाठीशी खंबीर; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Live breaking news updates from Goa: गोव्यातील राजकारण, समाजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा - कला - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
Goa Live News: मंत्री गावडेंच्या विरोधात सरकारातून षडयंत्र, 'उटा'गावडेंच्या पाठीशी खंबीर
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. प्रमोद सावंतांना मुख्यमंत्री करण्यात गावडेंचा मोठा वाटा, उटाचे अध्यक्ष विश्वास गावडेंचा दावा

वेळोवेळी मंत्री गोविंद गावडेंचा सरकारला मोठा आधार झालेला आहे. शिरोडा मतदारसंघातील पोटनिवडणूत असू वा 2022ची निवडणूक असू. डॉ.प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात देखील गोविंद गावडेंचा सिंहाचा वाटा. उटाचे अध्यक्ष विश्वास गावडेंचा उटाच्या सभेत दावा.

मंत्री गावडेंच्या विरोधात सरकारातून षडयंत्र, 'उटा'गावडेंच्या पाठीशी खंबीर

मंत्री गोविंद गावडेंच्या विरोधात सरकारातूनच षडयंत्र सुरु आहे. एक कोण तरी राजकीय व्यक्ती गावडेंचे अस्तित्व संपवू पाहत आहे. मात्र आम्ही ठामपणे सांगू इच्छितो की मंत्री गोविंद गावडेंच्या पाठीशी उटा संघटना ठामपणे उभी आहे - विश्वास गावडे, अध्यक्ष, उटा संघटना

बांदोडा पंचायतीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट पंचायतीचा पुरस्कार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बांदोडा पंचायत मंडळाला उत्कृष्ट पंचायतीचा पुरस्कार दिला. वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि माधवराव ढवळीकर यांच्या योगदानामुळे पंचायतीला पुरस्कार मिळाला असे सरपंच रामचंद्र नाईक म्हणाले.

आडपईत दोन तासांत झाड कोसळण्याची दुसरी घटना, सुदैवाने दुर्घटना टळली!

आडपई येथे महेश नाईक आणि गुरुदास नाईक यांच्या घरावर झाड कोसळले. अवघ्या एका तासात दोन घरावर झाडे कोसळले. सुदैवाने दुर्घटना टळली.

आडपई येथे घरावर कोसळला माड, सुदैवाने दुर्घटना टळली!

आडपई येथील मंगलदास नाईक आणि श्रीकांत नाईक यांच्या घरावर माड कोसळल्यानंतर माडाचा काही भाग रस्त्यावर कोसळला. घटनेवेळी रस्त्यावर कोणीच नसल्याने दुर्घटना टळली. फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.

पर्यावरण, कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा दिल्ली रुग्णालयात दाखल

गोव्याचे पर्यावरण आणि कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना उपचारासाठी पुन्ही दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साखळीत घरफोडी! 2.25 लाखांच्या चोरीप्रकरणी तिघांना अटक

साखळीत घरफोडी केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी भीमा (३६), बाबजान (५०) आणि जावेद (४०) यांना अटक करण्यात आली आहे. तिघांनी घरफोडी करुन ७५ हजार रोख, ७० हजार रुपयांची सोन्याची चैन आणि ७० हजार रुपयांची सोन्याची नाणी चोरी केली आहे.

गोव्यातून अपहरण झालेली 15 वर्षीय मुलगी बिहारमध्ये सापडली

डिचोली, गोवा येथील अपहरण झालेली 15 वर्षीय मुलगी बिहारमध्ये सापडली आहे. २८ फेब्रुवारी ते ०१ मार्च या काळात मुलीचे अपहरण झाले होते पोलसांनी तपासअंती मुज्जफपूर येथून मुलीचे सुटका केली आहे. मुलगी सुरक्षित असून, २३ वर्षीय संशयित संदेशला अटक करण्यात आली आहे.

Goa Live News: मंत्री गावडेंच्या विरोधात सरकारातून षडयंत्र, 'उटा'गावडेंच्या पाठीशी खंबीर
FDA Raid: पिळर्ण, पर्रा येथे एफडीएचा छापा; दोन मटण शॉप, IDC येथील कँटीन सील, काजू युनिटवरही कारवाई

मुख्यमंत्री प्रमोद यांच्याकडून गोमंतकीयांना घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना गोवा घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Goa Statehood Day: गोंय घटक राज्य दिसाचीं परबीं!

समेस्त गोंयकारांक गोंय घटक राज्य दिसाचीं परबीं!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com