Goa News: आमदार डीकॉस्टा यांची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिस तक्रार दाखल; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Marathi News 31 December 2024: गोव्यातील गुन्हे, राजकारण, क्रीडा, मनोरंजन यासह नवीन वर्ष, सनबर्न अशा प्रमुख घडामोडी
Goa Live News: आमदार डीकॉस्टा यांची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलिस तक्रार दाखल!
Altone D'CostaDainik Gomantak
Published on
Updated on

आमदार डीकॉस्टा यांची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलिस तक्रार दाखल!

कुंक्कळी पोलिस स्थानकात आमदार एल्टन डीकॉस्टा यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याची तक्रार दाखल केली आहे. ही ऑडिओ क्लिप माझी नाही आणि ती केवळ माझी प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने तयार करण्यात आली आहे असे आमदारांनी स्पष्ट केले.

गोव्याच्या महसूल संकलनात विक्रमी वाढ; मुख्यमंत्री सावंतांची माहिती

गोव्याने डिसेंबर 2024 च्या महसूली संकलनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. 2024 मधील एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 2023 पेक्षा 365.43 कोटींचा महसूल अधिक जमा. 2023 मध्ये एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 4249.34 कोटी जमा झाले होते. 2024 मध्ये एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 4614.77 कोटी रुपये जमा केले, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

अमलीपदार्थ तस्करी आणि सेवन प्रकरणी 188 जणांना अटक!

अमलीपदार्थ तस्करी आणि सेवन प्रकरणी 2014 मध्ये राज्यात 159 गुन्हे दाखल, तर 188 जणांना अटक करण्यात आली. तसेच, 9.81 कोटी रुपये किमतीचा 274 किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आला.

Adios El Viejo!! गोव्यात यंदाही ओल्ड मॅनची परंपरा कायम

जुन्या वर्षातील वाईट गोष्टी, घटना, आठवणी कायमच्या जाळून टाकण्यासाठी गोव्यात ओल्ड मैनची जुनी परंपरा जपली जाते.

बेतोडा येथे गाडीने घेतला पेट

बेतोडा-दत्तगड येथे सोमवारी रात्री गाडी जळून खाक. अंदाजे १२ लाखाचे नुकसान. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.

कळंगुट येथे पर्यटकाच्या हत्येत सामील चौघांना अटक

पर्यटक भोला रवी तेजा (२८, आंध्र प्रदेश) यांच्या हत्येप्रकरणी कळंगुट पोलिसांनी आग्नेल सिल्वेरिया (६४, कळंगुट), शुबर्ट सिल्वेरिया (२३, कळंगुट), अनिल बिस्ता (२४, नेपाळ) आणि कमल सुनल (२३, नेपाळ) यांना अटक केली.

मडगाव शहरात घरफोडीची प्रकरणं सुरुच

रविवारी (दि.२९ डिसेंबर) नवीन मार्केटमध्ये दरोड्याचा प्रयत्न केल्यानंतर चोरट्यांनी मडगाव येथील आके येथील फार्मसीचे शटर तोडले.

सत्तरी गोळीबार प्रकरण: आरोपींना ४ दिवसांची पोलिस कोठडी!

पाटवळ सत्तरी येथे बेकायदेशीररित्या जनावरांची शिकार तसेच गोळी लागून समद खान (२२) याच्या मृत्यू प्रकरणी बाबु उमर संघार व गाऊस नुर अहमद पटेल यांच्या पोलिस कोठडीत डिचोली न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com