Goa News: फोंडा येथे दिवसाढवळ्या गव्याचा धुमाकूळ; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News 2 February 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Indian Bison At Goa
Indian Bison At GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: फोंडा येथे दिवसाढवळ्या गव्याचा धुमाकूळ

फोंडा येथे दिवसाढवळ्या गव्याचा धुमाकूळ, या घटनेमुळे सध्या सगळीकडेच चिंता पसरली आहे.

Goa Temple: मोरजी येथील श्री कुळकार सातेरी देवीचा वार्षिक वर्धापन दिन

मोरजी येथील श्री कुळकार सातेरी देवीचा वार्षिक वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा सुहासिनी महिलांचा जोडाव्या जलण्याचा कार्यक्रम पावणी साजरी केली.

Land Issues Goa: उत्तर गोव्याच्या कलेक्टर आयएएस गित्ते यांना अल्वारा जमीन प्रकरणावर थोडक्यात माहिती देण्यासाठी वेळ नाही!

अल्वारा जमीन बेकायदेशीर विक्रीतील अनियमिततेवर चर्चा करण्यासाठी सोमवारी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते IAS यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावण्यात आली होती. याबाबत माध्यमांनी गित्ते यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला आणि थेट केबिनमध्ये गेल्या. नंतर गित्ते यांनी बाहेर वाट पाहणाऱ्या पत्रकारांना संदेश पाठवला की, त्यांच्याकडे माहिती देण्यासाठी वेळ नाही.

Goa News: म्हादई अभयारण्यात कार्यरत ट्रेकर्स तीन महिन्यांपासून पगाराविना!

माळोली, नानोडा, बांबर सत्तरी येथील म्हादई अभयारण्य क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रेकर्स गेल्या ३ महिन्यांपासून पगाराशिवाय आहे, माळोली येथे म्हादई अभयारण्य रुजू झाल्यापासून अनेकजण या ठिकाणी रोजगारांच्या पगारावर काम करत आहेत. अनेकांना १३ ते १४ वर्ष पूर्ण झालेली आहे.

Goa Electricity Department: अनधिकृत केबल्स काढण्यासाठी केबल ऑपरेटर्सना 10 दिवसांची मुदत

वीज विभागाने सर्व केबल ऑपरेटर आणि इतर घटकांना वीज खांबावरील अनधिकृत केबल्स आणि पायाभूत सुविधा 10 दिवसांच्या आत हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास विभाग त्यांना काढून टाकण्यास सुरुवात करेल, असे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले.

Goa Crime: मयेत बेकायदेशीर 'हिल कटिंग'

मये पंचायत क्षेत्रात बेकायदेशीरपणे डोंगर कापणी. तक्रार करूनही सरकारी यंत्रणांचे कानावर हात. स्थानिकांचा आरोप.

Goa land Issue: अल्वारा जमीन कारवाईविषयी आज होणार निर्णय

अल्वारा जमीन कारवाईविषयी आज निर्णय होणार आहे. या बैठकीत उपजिल्हाधिकारी कारवाईचा अहवाल सादर करणार आहेत.

Goa Agriculture: मायणा न्हावेलीत 3 लाख चौरस मीटर शेतीची लागवड

न्हावेली गावातील मायणा येथील सध्या ३ लाख चंरस मीटर शेतजमिनी शेतकऱ्यांना लागवडीखाली घेतली आहे. या शेतात भात व हळसांदे अशी दोन पिके काढली जातात.

Goa News: मोरजी किनाऱ्यावर ६००० पेक्षा जास्त समुद्री कासवांची अंडी

मोरजी समुद्रकिनाऱ्यावर डिसेंबर २५ ते फेब्रुवारी २ पर्यंतच्या कालावधीत एकूण ६१ सागरी कासवानी ६००० पेक्षा जास्त अंडी घातलेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com