Goa Liquor Seized: गोवा बनावटीची 72 लिटर दारु जप्त, कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

गोव्याहून बेंगळुरूला एसआरएस बसमधून नेण्यात येत होती दारु
Goa Liquor Seized
Goa Liquor Seized Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Liquor Seized गोव्याहून बेंगळुरूला एसआरएस बसने नेत असलेली गोवा बनावटीची 72 लिटर दारू माजली उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली असल्याची माहिती मिळतेय.

या प्रकरणी बसचालक लिंगनगौड पाटील (वय 63) याला अटक करण्यात आली असून 25.95 लाख रुपयांची दारू आणि बस जप्त करण्यात आलीय.

Goa Liquor Seized
Goa Green Cess Case: उच्च न्यायालयाने आदेश दिला, आता थकीत 230.35 कोटी सरकार कधी वसूल करणार?- आलेमाव

काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यातील अवैध दारूला आळा घालण्याचे निर्देश दिले होते.

गोव्यातून कर्नाटकात होणाऱ्या दारू वाहतुकीवर नजर ठेवा आणि अवैध मद्यवाहतूक रोखा असे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले होते.

या घटनेला अवघे काही दिवस उलटताच आज म्हणजेच शुक्रवारी माजली उत्पादन शुल्क विभागाने हि कारवाई केल्याचे समजतेय.

सध्या गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्याच्या सीमावर्ती भागात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय.

लगतच्या राज्यांनीही विशेषतः गोव्यासारख्या सीमावर्ती भागातील राज्यातून होणाऱ्या दारूच्या अवैध वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com