Goa Liberation Day: ''...गोमंतकीयांना भारतीय म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला''; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिल्या मुक्ती दिनाच्या शुभेच्छा

Union Home Minister Amit Shah: गोव्याच्या इतिहासात 19 डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गोव्यात हा दिवस 'गोवा मुक्ती दिन' म्हणून साजरा केला जातो.
Goa Liberation Day Greetings From Union Home Minister Amit shah
Goa Liberation Day Greetings From Union Home Minister Amit shahDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Liberation Day Celebrations

गोव्याच्या इतिहासात 19 डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गोव्यात हा दिवस 'गोवा मुक्ती दिन' म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये याच दिवशी भारतीय सशस्त्र दलांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून गोव्याला आझाद केले होते. सुमारे 450 वर्षे पोर्तुगीजांच्या बंदिशीत राहिलेल्या गोव्याच्या स्वातंत्र्याचा हा दिवस प्रत्येक गोमंतकीयांसाठी खूप खास आहे. गोव्याचा हा मुक्ती दिन प्रत्येकांसाठी प्रेरणादायी आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, ''गोव्याच्या मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या शूरविरांना राष्ट्र श्रद्धांजली अर्पण करते. स्वातंत्र्यसैनिक आणि सशस्त्र दलांच्या असामान्य धैर्य आणि समर्पणाला सलाम आहे. मी गोव्याच्या (Goa) जनतेला गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देते. तसेच, त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करते.''

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ''गोवा मुक्ती दिनाच्या गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा.... देशभक्ती आणि स्वातंत्र्याच्या अदम्य भावनेचे स्मरण करणारा हा आजचा दिवस आहे, ज्याने त्यांना भारतीय म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला. या चळवळीत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या महान शूरविरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,'' असे शाह यांनी ट्विट करत म्हटले.

जे.पी नड्डा

मोदी सरकारमधील मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देखील गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ''गोवा मुक्ती दिनानिमित्त मी राज्यातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हा दिवस गोवा मुक्त करण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करुन देतो. ज्यांच्या योगदानामुळे या चैतन्यशील राज्याचे भाग्य घडले. मी अशा महान शूरविरांना नमन करतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com