मुक्तिदिनी मुख्‍यमंत्र्यांचा तुळसकरवाडीत निषेध; पीडित शेतकऱ्यांकडून पुतळ्याचे दहन

विमानतळासाठीच्या महामार्गासाठी पोलिस व सरकारी यंत्रणेचा उपयोग करून बळजबरीने आमच्या शेतजमीनी बळकावल्या
Tulaskar Wadi Farmer

Tulaskar Wadi Farmer

Dainik Gomantak

पेडणे : नागझर, तुळसकरवाडी, दाडाचीवाडी येथील मोपा विमानतळ पीडित शेतकऱ्यांनी गोवा मुक्तिदिनाच्‍या रात्री तुळसकरवाडी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्याचे दहन करून भाजप सरकारविरुद्ध निषेध व्‍यक्त केला. यावेळी त्‍यांनी आपल्‍यावर झालेल्‍या अन्‍याय व्‍यक्त केला.

<div class="paragraphs"><p>Tulaskar Wadi Farmer</p></div>
राज्यात ख्रिसमसचा माहोल सजू लागला!

यावेळी बोलताना शेतकरी (Farmers) म्हणाले की, यापूर्वी तिळारी कालव्यासाठी, मोपा विमानतळासाठी, ॲरो सिटी व विमानतळासाठीच्या महामार्गासाठी पोलिस व सरकारी यंत्रणेचा उपयोग करून बळजबरीने आमच्या शेतजमीनी बळकावल्या. आमच्‍या राहत्या घरावर कुठलीही पूर्वकल्पना न देता बुलडोझर घालून पाडली व आम्‍हाला बेघर केले.

<div class="paragraphs"><p>Tulaskar Wadi Farmer</p></div>
कांपाल मैदानावर खेळणे सोडाच, चालणेही मुश्‍‍कील!

शेती, उस, काजू बागायती कष्‍टाने उभारून त्‍यावर आमच्‍या कुटुंबियांचे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले. ॲरो सिटीसाठी आमच्या काजू बागायतींना आग लावली, तर विमानतळ (Airport) महामार्गासाठी पंधरा-वीस पोलिसांच्‍या गाड्या आणून आमच्या महिला, मुले, वृद्धांवर पोलिस बळाचा वापर करून अमानुष लाठीमार केला. भाजप सरकारची (BJP government) ही अमानुष कृती पाहिल्यावर गोवा मुक्त (Goa Liberation) झालेला, हे आम्‍हाला अजिबात पटत नाही. उलट पोर्तुगीजांच्या चार पटीने आमच्‍यावर अत्याचार होत असल्‍याचे भूमिपुत्रांनी म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com