Goa News : ‘गोवा राज्य युवा धोरण अधिसूचित करावे’: आमदार व्हेन्झी व्हिएगस

Goa Legislative Assembly : प्रत्येक मतदारसंघासाठी वर्षाकाठी क्रीडा साधनसुविधा खरेदीसाठी देण्यात येणारा २.५ लाखांचा निधी खूपच कमी आहे, त्यात वाढ करण्यात यावी.
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024
Mla Venzy ViegasDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, गोव्यातील क्रीडा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी साधनसुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय धोरणाच्या धर्तीवर राज्यातही गोवा राज्य युवा धोरण अधिसूचित करण्यात यावे.

प्रत्येक मतदारसंघासाठी वर्षाकाठी क्रीडा साधनसुविधा खरेदीसाठी देण्यात येणारा २.५ लाखांचा निधी खूपच कमी आहे, त्यात वाढ करण्यात यावी. राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवणाऱ्यांसाठी सरकारी नोकऱ्या दिल्यास अनेकजण क्रीडा क्षेत्राकडे वळतील, असे मत आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी क्रीडा खात्याच्या मागण्यांवरील चर्चेवेळी आज विधानसभेत व्यक्त केले.

कला अकादमीच्या नूतनीकरणार यापूर्वी बरीच चर्चा झाली आहे व जो काही प्रकार झालेला आहे तो सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यावर आणखी काही बोलण्याची गरज भासत नाही. या कला अकादमीला पूर्वीचे वैभव व दर्जा पुन्हा आणावा.

कला व संस्कृती खात्याकडून प्रत्येक आमदारांना देण्यात येणारा निधी समान असावा. त्यामध्ये भेदभाव करू नये. कला गौरव पुरस्कार देण्यामध्ये भेदभाव केला जातो. या पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेत पारदर्शकता नाही ती आणावी.

कला सन्मान योजना सध्या बंद आहे ती पुन्हा सुरू करावी. ग्रामीण विकास यंत्रणा खात्यामध्ये कर्मचाऱ्यांची उणीव आहे ती पूर्ण करावी, असे मत व्हिएगस यांनी मांडले.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024
Go First कंपनीच्या विमानात बिघाड, दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या फ्लाईटची जयपूरला लॅंडींग

चांगले प्रशिक्षक निवडावेत

राज्यात गोवा राज्य युवा धोरण नसल्याने युवा पिढीला क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडे कोणतीच योजना नाही. साधनसुविधांअभावी क्रीडा क्षेत्राकडे युवा पिढी वळत नाही. सरकारने क्रीडा क्षेत्रात युवकांना संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात.

त्यासंदर्भातची जागृती व्हायला हवी. पुढील राष्ट्रीय स्पर्धांसाठी गोव्याने आतापासूनच खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची नियुक्ती करावी. त्यामुळे युवा पिढी खेळाकडे वळू शकते, असे मत व्हिएगस यांनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com