Goa Politics: भाजपचे नेते निघाले प्रचाराला

Goa Politics: जम्बो पलटण : निवडणूक गुजरातची, उत्सुकता देशाला
goa leders Gujarat Election campaign
goa leders Gujarat Election campaign Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: 1195 पासून सलग 27 वर्षे भाजपची सत्ता असलेले देशातले गुजरात हे एकमेव राज्य आहे. या राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच गोव्यातील अनेक नेते गुजरातला आपापल्या पक्षांच्या प्रचाराला निघाले आहेत.

यात सर्वांत मोठा जम्बो गट भाजपचा आहे. भाजपचे तीन विभागांमधले नेते या निवडणुकीत सक्रिय असतील. तसेच आम आदमी पक्षाचे नेतेही झाडून या निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये नेहमीसारखी निर्णय घेण्यापासूनच कूर्मगती आहे.

गुजरातमधील दोन नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे सध्या देशाचे नेतृत्व करत आहेत. देशाच्या नंबर एक आणि दोन पदावर असलेल्या राष्ट्रीय नेत्यांच्या बालेकिल्ल्यांची ही निवडणूक असल्याने देशभर याबाबत पराकोटीची उत्सुकता निर्माण झाली आहे. तेथील २०१७ ची निवडणूक भाजपला अनपेक्षितपणे जड गेली होती. यंदा मात्र भाजपने ही निवडणूक खूपच गांभीर्याने घेतल्याचे दिसते.

यासाठी केंद्रीय नेते, स्टार कॅम्पेनियर आणि मतदारसंघ, बूथ स्तरावरील कार्यकर्ते सक्रिय केले आहेत. गोव्यातूनही मोठा गट या निवडणुकीसाठी रवाना होत आहे. दुसरीकडे ही निवडणूक आम आदमी पक्षानेही तितकीच गांभीर्याने घेतली असून पंजाबपाठोपाठ गुजरातमध्ये आपल्या अस्तित्वासाठी आम आदमी पक्ष धडपडताना दिसत आहे.

यासाठीच पक्षाचे केंद्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सक्रिय झाले आहेत. दिल्लीबरोबर पंजाबमधील नेते या निवडणुकीत उतरवले आहेत. गोव्यातूनही पक्षाचे आमदार, राज्य संयोजक आणि विविध पदांवरचे नेते या निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी दिली आहे.

काँग्रेसमध्ये सन्नाटा

2017 सालच्या निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती. तेथे दोन नंबरचा पक्ष बनलेल्या काँग्रेसमध्ये आता प्रचाराबाबत शिथिलता दिसत आहे. पक्षाचे नेते भारत जोडो आंदोलनात सक्रिय आहेत. गोव्यातील स्थितीही तीच आहे. आमदारांच्या घाऊक पक्षांतरानंतर पक्ष सध्या अस्तित्वासाठी धडपडत आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रचाराला कोण जाणार, याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाही.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष स्टार प्रचारक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, दामू नाईक, नरेंद्र सावईकर हे स्टार प्रचारक म्हणून गुजरात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार तेंडुलकर यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी आहे.

12 नेत्यांचा गट कार्यरत

गुजरात निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचारात कार्यरत राहण्यासाठी 12 जणांचा गट सक्रिय करण्यात आला आहे. यात सिद्धार्थ कुंकळ्येकर, सर्वानंद भगत, गोरख मांद्रेकर, रूपेश कामत, संजीव कुंकळकर, नागराज बोरकर, किशोर अस्नोडकर, तुळशीदास नाईक, यशवंत नाईक, संकेत आरसेकर यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com